गटारीच्या कामाची लाच घेताना दौंड तालुक्यातील ग्रामसेवक ACB च्या जाळ्यात



|सहकारनामा|

दौंड : बंदिस्त गटारीच्या केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी 30 हजारांची लाच मागणाऱ्या  ग्रामसेवकास लाचलुचपत विभागाने (ACB) ने सापळा रचून जेरबंद केले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार  गार येथील ग्रामसेवक नवनाथ किसन चव्हाण  (वय -35 वर्षे, पद- ग्रामसेवक, वर्ग – 3, ग्रामपंचायत गार,ता.दौंड, जि.पुणे) व खाजगी इसम सचिन लहानू वायसे (33 वर्षे, ग्रामपंचायत गार) यांनी तक्रारदार यांना त्यांनी दौंड येथील बंदिस्त गटारीचे काम केले होते त्या केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठ तीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क साधत तक्रार दिली होती.या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने दौंड येथे सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारताना खाजगी इसम आरोपी व सदर लाच ग्रामसेवकास ताब्यात घेतले.

हि कारवाई अधिक्षक,लाप्रवि पुणे.

श्री.राजेश बनसोडे,पोलीस अधीक्षक,लाप्रवि पुणे परिक्षेत्र.  श्री.सुरज गुरव,अपर पोलीस अधीक्षक,लाप्रवि पुणे.श्री.सुहास नाडगौडा, अपर पोलीस अधिक्षक, लाप्रवि पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अलका सरग, पोलीस निरीक्षक,  सुनिल बिले, पो.ना.रितेश थरकार, म.पो. शि.पूजा पागिरे, पो. शि. चालक अभिजित राऊत,

ला.प्र.वि.पुणे युनिट यांनी केली आहे.