Categories: राजकीय

अनैसर्गिक सरकार आणि गृहमंत्रीच फरार : गोपीचंद पडळकर

पुणे ग्रामीण : भाजप (bjp) आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. निमित्त होते दौंडचे आमदार राहुल कुल (rahul kool) यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचे.
गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच राज्यातील हे अनैसर्गिक सरकार आहे. हे निसर्गालाही मान्य नसल्याने हे सरकार येताच कोरोना, पूर, महामारी असा निसर्गाचा रुद्रावतार सुरू झाला अशी केली आणि.ल हे तिघाडी सरकार फक्त खादाडांचे सरकार आहे. हे इतके खादाड आहेत की ज्या गृहमंत्र्याला झेड प्लस सुरक्षा होती, त्याच गृहमंत्र्याला आता पोलीस शोधत आहेत. तर ज्या मंत्र्याचा जावई गांजामुळे जेलमध्ये आहे तो मंत्री रोज टीव्हीवर झळकत आहे. या सरकार मधील नेते तर एक से बढकर एक आहेत. एकाच घरात 13-13 कारखाने आहेत. आणि सभासदांचे 400 कोटींचे कारखाने यांनी 10-20 कोटीला घेतले आहे. यांचे मंत्री प्रत्येक फंड हा फक्त आपल्याच विभागात खर्च करतात मात्र तसा विकास कुठे दिसत नाही.
हे कुणालाही बारामतीला आणायचं झालं तर हे त्यांना एकाच रस्त्याने आणतात दुसरा रस्ता हे दाखवतच नाही. अख्या राज्याचे पैसे यांनी यांच्याच घशात घातले आहेत. ज्या तालुक्याचा मंत्री होत नाही त्याला हे पैसेच देत नाहीत. डीपीडिसी चा फंड मंत्री घेतात जर डीपीडिसी चा फंड सुद्धा मंत्र्याने नेला तर तालुक्याला कुठले पैसे मिळणार आणि विरोधी पक्षाचा आमदार आला तर त्याला फंड देत नाहीत. त्यामुळे आम्ही यांची फिकीर करत नाही कारण आम्ही सभागृह, देवळं बांधून पुढारी झालो नाही. आम्ही लोकांची कामे करतो म्हणून लोक आम्हाला जवळ घेतात. भाजप हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार करणारा पक्ष आहे त्यामुळे माझ्या सारख्या 500 मतदान असणाऱ्या गावातील युवकाला संधी देऊन त्यांनी आमदार बनवले आहे. भाजप जातीवादी नसून सर्वातजास्त sc, st आमदार हे भाजप मध्ये आहेत. सर्व जातीधर्माचे आमदार भाजपमध्ये आहेत. मात्र तरीही हे लोक भाजपला जातीवादी आणि स्वतःला पुरोगामी म्हणवतात. हे म्हणतात पुरोगामी महाराष्ट्र म्हणजे शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचे राज्य आहे. मग 13-13 कारखाने एका घरात घेताना यांनी शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार आत्मसात केला नाही. 400 कोटींचा सभासदांचा कारखाना 10 कोटींना घेतानाही शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा आदर यांनी केला नाही. आणि शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेऊन यांनी फक्त मते मिळवायची आणि एकदा का मते मिळून सत्ता आली की मग फक्त पैसे खायचे. असं कधी घडलं होत का राज्याचा गृहमंत्री फरार झाला आहे. आणि प्रकरण कोणते ते सर्वांना माहीत आहे. ज्या गृहमंत्र्याला झेड प्लस सुरक्षा होती त्याला पोलीस शोधत आहेत. एक मंत्री ज्यांचा जावई गांजच्या आरोपमध्ये जेलमध्ये ते रोज टिव्हीवर येतायत, विकासाच्या गोष्टी करतात, विद्यार्थ्यांची काळजी नाही, मराठा आरक्षण घालवले, सरकारच्या बाजूने लढणाऱ्या वकिलाने सांगितले की राज्य सरकार आम्हाला कागदपत्र देत नाही असले हे सरकार आणि त्याचे हे लाभलेले मंत्री आहेत यापेक्षा महाराष्ट्राचं दुर्दैव ते काय असेल असा प्रखर हल्ला आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणातून आघाडी सरकारवर चढवला.
यावेळी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनीही आघाडी सरकारवर टीका करताना महाराष्ट्रामध्ये जनतेने भारतीय जनता पक्षाच्या बाजूने कौल देऊन सुद्धा आपल्याला विरोधी पक्षांमध्ये बसावे लागतेय यावरूनच आपल्याला समजतंय की यांनी जनतेने दिलेला कौल झुगारून हे सरकार तयार केले आहे असे म्हणत दौंड आणि इंदापूर च्या शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न आपल्या समोर असला तरी आपल्याला माननीय देवेंद्र फडणवीस यांची भक्कम साथ आहे त्यामुळे चिंता करू नका दौंड आणि इंदापूर या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवणे ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे त्यामध्ये आम्ही कोणी कमी पडणार नाही. आमदार राहुलदादा कुल यांना आरोग्यदूत का म्हटलं जातं हे मी जवळून पाहिलं आहे. त्यांचे आणि आमचे संबंध हे त्यांच्या आजोबांपासून असल्याने त्यांची काम करण्याची पद्धत त्यांना अण्णांकडुन वारसाने मिळाली आहे त्यामुळे ते विकास कामात सरसच ठरत आहेत असे म्हणाले.
यावेळी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानत दौंड तालुक्यातील विविध विकासकामांची माहिती दिली आणि काही झालं तरी कारखाना कुठल्याही परिस्थितीमध्ये सुरू करणार करूनच आम्ही थांबू तोपर्यंत आम्ही थांबणार नाही असे सांगितले. या कार्यक्रमावेळी रणजित सिह मोहिते पाटील यांचेही भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये आम्ही दिल्लीत महत्वाच्या कामानिमित्त गेल्यानंतर कोरोना काळात दादांचे काम जवळून पाहिले. पुणे जिल्ह्यातून अनेक फोन यायचे आणि ते सर्वांची अडचण दूर करण्यासाठी रेमडीसीविर, बेड, प्लाझ्मा इत्यादी गोष्टींसाठी कायम फोनवर बिझी असायचे त्यामुळे त्यांना आरोग्यदूत ही जनतेने दिलेली पदवी तंतोतंत लागू होत असल्याचे सांगितले.
आमदार राहुल कुल यांचा अभिष्टचिंतन सोहळा भांडगाव येथील भांडगाव ग्रामविकास प्रतिष्ठान आणि त्याचे अध्यक्ष विजयराज मोहन दोरगे, सह अध्यक्ष प्रमोद रामचंद्र दोरगे, पुरस्कार समिती अध्यक्ष श्याम यशवंत कापरे, सचिव रवींद्र विठ्ठल जाधव, आणि खजिनदार संदीप मारुती दोरगे यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला हर्षवर्धन पाटील, रणजीतसिह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, कांचनताई कुल यांसह तालुका आणि जिल्ह्यातील मान्यवर मंडळी उपस्थिती होती.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

20 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago