दौंड
दौंड तालुक्यातील केडगाव येथील सनराईज अबॅकसच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. या विभागीय स्पर्धेत केडगावच्या १४ विध्यार्थ्यांना विजयी घोषित करण्यात आले. विजयी सर्व विध्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे.
पैकी १७ विध्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. तर सनराईज अबॅकसला देखील सन्मानित करण्यात आले.
रामकृष्ण मोरे सभागृह पिंपरी चिंचवड येथे ही स्पर्धा पार पडली. पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, ठाणे, सातारा, अहमदनगर या ठिकाणहुन सुमारे ७५९ विध्यार्थी सहभागी झाल्याची माहिती प्रोऍक्टिव्ह अबॅकसचे राज्य समन्वयक गिरीश करडे यांनी माहिती दिली. ६ मिनिटांत तब्बल १०० गणिते विध्यार्थ्यांनी यावेळी सोडवली.
या स्पर्धेत साडे चार वर्षाची अंकिता प्रमोद नेवसे हिने देखील बक्षीस पटकावले. ओमकार मधुसूदन काळभोर या चिमुकल्यांने लिटल चॅम्प गटात प्रथम प्रावीण्य मिळविले. लहान गटातील रितिका प्रवीण रुपनवर, जुई संदीप रणदिवे, समृद्धी सचिन जगताप, शरण्या सागर शेळके, हर्ष हेमंत वाघ, आर्यन विठ्ठल जगदाळे, कादंबरी निलेश जगताप, श्रीयश भूषण शेलार विध्यार्थी यशस्वी झाले. मोठ्या गटात अमृता विनोद नेवसे, अस्मिता सागर भांडवलकर, आयुष राहुल टूले, सार्थक रामचंद्र जगताप यशस्वी झाले.
सर्व विजयी विध्यार्थ्यांना कल्पना नवले व मयुरी मोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राजेंद्र लोचानी, अजय मण्यार, सारिका करडे, तेजस्विनी सावंत आदी प्रोॲक्टिव समन्वयक उपस्थित होते. यश संपादन केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे केडगाव परिसरातून कौतुक होत आहे.