जेवण करण्यासाठी मित्रांसोबत जात होता तरुण, टोरँटो CNG गॅस च्या वाहनाने चिरडून त्याची जीवनयात्राचा संपवली… केडगाव-चौफुला रस्त्यावरील भयानक घटना

दौंड : भूक लागली आहे. चला आज बाहेर जेवायला जाऊ असे म्हणून मित्रांसोबत आनंदात जेवायला निघालेल्या तरुणाला हे कुठे माहित होते कि पुढे त्यासमोर जेवण नाही तर मृत्यू वाढून ठेवला आहे. ज्याने मित्रांसोबत जेवणाचा बेत आखला त्यालाच टोरँटो CNG ची वाहतूक करणाऱ्या वाहनाने बेदरकारपणे चिरडून हे जगच सोडायला लावले असल्याची दुर्दैवी घटना केडगाव-चौफुला रोडवर घडली आहे.

केडगावमधून आपल्या दोन मित्रांसह दोन दुचाकीवर निघालेल्या तीन मित्रांपैकी रूशीकेष विलासराव शेनगांवकर यानेच बाहेर जाऊन जेवण करण्याचा बेत आखला आणि त्याचे दोन मित्र नितीन कठाळे आणि विजय बसके यांच्यासह ते दोन दुचाकिंवर केडगाव-चौफुला रस्त्याने हॉटेलकडे जाऊ लागले. CNG वाहतूक करणाऱ्या वाहनाखाली बळी गेल्याची ही दुसरी घटना असून या अगोदर पारगाव येथे अशीच घटना घडली होती ज्यामध्ये रांजणगाव सांडस येथील युवकाला आपले प्राण गमवावे लागले होते.

वरील घटनेची फिर्याद मृत ऋषिकेश चा मित्र नितिन प्रभाकर कठाळे (वय 27 रा. केडगांव, ता.दौंड जि.पुणे) याने दिली असून त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मीत्र ऋषिकेश विलासराव शेनगांवकर याचा त्याला फोन आला आणि मी, तु व विजय बसके असे आपण हाॅटेलवर जेवण करूया असे म्हणुन ते तिघेजन चौफुला दिशेने हॉटेलकडे जेवायला निघाले. यावेळी ऋषिकेश हा त्याच्या ताब्यातील मोटारसायकल क्र.एम.एच 38 ए सी 4656 वरून फिर्यादी यांच्या पुढे थोडया अंतरावर चालत होता. या नंतर फिर्यादीच्या पाठीमागुन केडगांव बाजुकडुन एक टोरॅन्टो सीएनजी गॅस कंपणीचा टॅम्पो क्र. GJ 02/ZZ 8385 त्यांना पास होवुन पुढे चैफुला बाजुकडे भरधाव वेगाने जात असताना त्याने समोर चाललेल्या ऋषिकेश विलासराव शेनगांवकर याच्या मोटार सायकलला जोराची धडक दिली. तसेच त्या टेम्पोने त्यास काही अंतर फरफटत नेले त्यामुळे ऋषिकेश हा त्या टॅम्पोच्या चाकाखाली चिरडून गंभीर जखमी झाला होता. CNG वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाने वाहन तेथेच सोडून पळ काढला होता. गंभीर जखमी ऋषिकेश यास त्याच्या मित्र व पोलिसांनी अॅम्ब्युलंन्स मध्ये यवतच्या ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर तेथील डाॅक्टरांनी त्याला मयत घोषित केले.

काही वेळापूर्वी आपल्यासोबत जेवायला निघालेल्या मित्राचा असा दुर्दैवी मृत्यू पाहून त्याच्या मित्रांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. CNG वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तक्रारी वाढत चालल्या असून लोकांच्या वाहनांना कट मारणे, भरधाव वेगात गाडी चालवत नेऊन जागेवर ब्रेक मारणे, सिंगल रस्ता असताना वाहन भरधाव वेगात चालवून दुसरी वाहने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करणे, वाहनांना धडक देणे असले प्रकार सध्या या वाहनांकडून मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी सदर वाहन चालक आणि मालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. या घटनेचा अधिक तपास यवत चे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार बगाडे करीत आहेत.