Categories: क्राईम

सासरी नांदायला आलेल्या महिला आणि तिच्या आईला लाकडी दांडक्याने जबर मारहाण, बारामतीच्या ‘सुपे’ येथे मुस्लिम महिलांच्या घरगुती हिंसाचारात वाढ!

बारामती : गेल्या काही महिन्यांत सुपे ता.बारामती येथील मुस्लिम महिलांच्या घरगुती हिंसाचारात वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. काही महिला आपल्या परिवाराची इज्जत जायला नको म्हणून घरातच अन्याय सहन करत असून काही मात्र आता हे खूप झाले, आता अन्याय सहन करायचा नाही असे मनाशी ठरवत या अन्यायाला वाचा फोडून थेट पोलीस ठाणे गाठत आहेत.

असाच काहीसा प्रकार सुपे (ता.बारामती) येथे घडला असून सासरी नांदायला आलेल्या महिला आणि तिच्या आईला सासरच्या लोकांनी रात्रीच्यावेळी लाकडी दांडक्याने जबर मारहाण केल्याची गंभीर घटना सुपे येथे घडली आहे. याबाबत सासरच्या 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सना परवेज शिकलगार ह्या त्यांच्या आईसोबत सुपे (ता.बारामती) येथे नांदायला आल्या असता आरोपी परवेज इसाक शिकलगार, तय्यब इसाक शिकलगार, असिफा इसाक शिकलगार, इसाक अब्बास शिकलगार सर्व रा.सुपे (ता.बारामती) यांनी सना शिकलगार हिस शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.

तसेच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आरोपी यांनी तुझी हिम्मंत कशी झाली येथे यायची, असे म्हणत सना हिच्या हातातील मोबाईल हिसकावुन घेवुन जमिनीवर आपटुन तो फोडुन टाकत नुकसान केले व त्यानंतर फिर्यादीच्या डोक्यात डावे बाजुस लाकडी दांडक्याने मारहाण करून पुन्हा तिच्या दोन्ही पायांवर मारहाण करत असताना फिर्यादीची आई सना हिला सोडविण्यासाठी आली असता तिला सुध्दा ढकलुन देवुन आरोपी यांनी फिर्यादीची
आई अफसर हिस हाताने मारहाण करून शिवीगाळ केली.

या सर्व प्रकारानंतर फिर्यादी व तिच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने वरील 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

20 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago