पाटस टोल नाक्याजवळ महिला आणि तिच्या पतीला जबर मारहाण, डोक्यात गॅस ची टाकी आणि लोखंडी गजाने प्रहार

दौंड : पाटस टोल नाक्याजवळ टी स्टॉल चालवीणाऱ्या महिला आणि तिच्या पतीला शेजारी असणाऱ्या टी स्टॉलवरील दोन पुरुष आणि एका महिलेकडून जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत रेखा शहाजी मंजुळकर (रा.पाटस, ता.दौंड, व्यवसाय टी स्टॉल) यांनी फिर्याद दिली असून तिघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाटस गावच्या हद्दीत फिर्यादी महिला व त्यांचे पती शहाजी मंजुळकर हे पाटस टोल नाक्याजवळ त्यांच्या टी स्टॉलवर असताना त्या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. त्यावेळी त्यांच्या बाजुच्या टि स्टॉलवर असणारे आरोपी यांनी त्यांना म्हणाले कि, तुम्ही आम्हाला शिवीगाळ करत आहात, असे म्हणुन मंजुळकर दांपत्याला शिवीगाळ, दमदाटी केली.

त्यावेळी फिर्यादीने आम्ही तुम्हाला शिवीगाळ करीत नाही, आमची आपसात भांडणे सुरु असल्याचे त्यांना सांगितले. मात्र आरोपिंनी त्यावर विश्वास न ठेवता पवन उर्फ मारुती पोळेकर, गणेश पोळेकर तसेच करुणा उर्फ पूजा तुपरे या तीन आरोपिंनी फिर्यादीच्या डोक्याचे केस ओढुन हाताने तसेच लाथाबुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पवन पोळेकर याने त्याच्या स्टी- स्टॉलवर असणारी ०५ किलो वजनाची गॅसची मोकळी टाकी फिर्यादीच्या डोक्यात मारली तर फिर्यादीचे पती शहाजीमंजुळकर यांना तेथील छत्री ठोकायचा गज काढुन त्यांच्या डोक्यात मारला.

गॅस टाकी आणि गजाच्या प्रहाराने फिर्यादी व त्यांचे पती खाली पडले असताना वरील
तिघांनी पुन्हा त्यांना हाताने तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली. याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ह. बंडगर करीत आहेत.