दौंड : रोटरी क्लब ऑफ दौंड, रोटरी क्लब कुरकुंभ MIDC, रोटरी क्लब ऑफ पाटस, ज्युपीटर हाॅस्पीटल पुणे, दौंड मेडीकल असोशिएशन व रोटरॅक्ट क्लब ऑफ दौंड काॅलेज यांचे संयुक्त विद्यमाने डाँक्टर डे दिन निमित्त दौंड, कुरकुंभ, पाटस येथील डाॅक्टरांसाठी वाॅकेथाॅनचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये सुमारे 160 डाॅक्टरांनी सहभाग नोंदवला.
दौंड येथील राज्य राखीव पोलीस दल मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विजयी स्पर्धकांना राज्य राखीव पोलीस दल पोलीस ग्रुप 7 चे सहायक समादेशक शिंदे साहेब,गवारी साहेब,पोलीस कल्याण विभाग चे निरिक्षक डहाळे साहेब ,रोटरी क्लब ऑफ दौंड चे अध्यक्ष डॉ राजेश दाते यांचे शुभ हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ दौंड चे सर्व सदस्य,दौंड मेडीकल असोशिएशन,रोटरॅक्ट क्लब चे सर्व सदस्य यांनी विशेष सहकार्य केले.
समाजासाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या डाॅक्टरांचे आरोग्य सदृढ रहावे यासाठी या स्पर्धेचे विशेष आयोजन करण्यात आले असे रोटरी क्लब ऑफ दौंड चे अध्यक्ष डॉ राजेश दाते यांनी सांगीतले. सर्व सहभागी स्पर्धक ,स्पर्धेसाठी सहकार्य करणारे सर्वांचे विशेष आभार रोटरी क्लब ऑफ दौंड चे सचिव अमीर शेख यांनी व्यक्त केले.