वाढदिवसानिमित्त अजितदादांना ‘लाडकी बहीण’ योजनेची अनोखी भेट

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांनी हाताने बनविलेल्या लाडकी बहीण योजनेचे स्केच महानंदाच्या माजी अध्यक्षा वैशालीताई नागवडे यांच्यावतीने भेट देण्यात आले.

जरांगे पाटलांना घेरण्याचा प्लॅन

राज्यात सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. या योजनेमुळे सर्वसामान्य महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. याच गोष्टीचे औचित्य साधून अजितदादांना हे स्केच देण्यात आल्याचे वैशालीताई नागवडे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी २५ हजार कोटींची तरतूद – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

राज्यातील भगिनींसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी २५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

शरद पवार देशातील सर्वात मोठे भ्रष्टाचारी – अमित शाह

या योजनेविषयी अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ४ लाख २९ हजार अर्ज प्राप्त झाले आहे. ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केलेल्या महिला भगिनींनादेखील जुलै महिन्यापासून लाभ देण्यात येईल. योजनेसाठी प्रत्येक महिन्यात साधारण ३ हजार ५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिलेला मिळू शकेल. जिल्ह्यातील सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात अर्ज भरण्यासाठी सुविधा करण्यात आली असल्याचे यावेळी अजितदादांनी सांगितले.