अख्तर काझी
दौंड : दौंड -गोपाळवाडी रोड वरील समता नगर परिसरात भरधाव वेगात येणाऱ्या चार चाकी वाहनाने दुचाकी स्वाराला धडक दिल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर पडून जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी नामदेव गेनबा लडकत (वय 43,रा. नानवीज, दौंड) यांनी फिर्याद दिली. दौंड पोलिसांनी वाहन चालक अजिंक्य येळे (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 3 एप्रिल रोजी सायंकाळी 4 च्या दरम्यान फिर्यादी गोपाळवाडी येथील बँकेचे काम करून, सरपंच वस्ती येथील मेडिकल दुकानात औषध आणण्यासाठी जात असताना परिसरातील हॉटेल रुचिराच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या चारचाकी वाहनाने फिर्यादी यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली.
या अपघातात फिर्यादी रस्त्यावर पडून जखमी झाले. वाहन चालक अजिंक्य येळे अपघात करून निघून गेला, स्थानिकांनी जखमी फिर्यादी यांना येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. नामदेव लडकत यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी अजिंक्य येळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.