Categories: Previos News

आमदार ‛राहुल कुल’ यांच्या समोर झाला दुचाकी-चारचाकीचा ‛अपघात’, पहा पुढे काय झाले

दौंड : दौंड चे विद्यमान आमदार ॲड. राहुल कुल हे आज दौंड तालुक्यातील आलेगाव येथे एका नियोजित कार्यक्रमासाठी आले असता दौंड – सिद्धटेक अष्टविनायक मार्गावर एका दुचाकी व चार चाकी वाहनाचा अपघात झाल्याचे त्यांचा निदर्शनास आले.

अपघातस्थळी आमदार कुल यांनी त्यांची गाडी तात्काळ थांबवून अपघातग्रस्त दुचाकीस्वाराला त्यांच्या स्वतःचा गाडीतुन तात्काळ दौंड ग्रामीण रुग्णालय येथे पाठवून दिले आणि स्वतः रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून रुग्णाला अत्यावश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली. दुचाकीस्वार गंभीर जखमी असतानाही आ.कुल यांनी तातडीने केलेल्या मदतीमुळे पुढील अनर्थ टळला.

आमदार कुल यांनी दाखविलेल्या समयसूचकता व संवेदनशीलतेचे कौतुक होत असून त्यांना लोक आरोग्यदूत का म्हणतात याचाच आज पुन्हा प्रत्यय आला. प्रशस्त अशा दौंड सिद्धटेक अष्टविनायक मार्गाचे काम झाल्यापासून या रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली असून चार चाकी वाहने सुसाट धावतात यानिमित्ताने रस्ते सुरक्षिततेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

10 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago