दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव रेल्वेलाईनवर एका 24 वर्षीय युवकाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आदित्य ओव्हाळ (वय 24, रा.आंधळगाव) असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली असून त्याचे पारगाव (सालू मालू) येथे मेडिकल असल्याची माहितीही त्यांच्याकडून मिळाली आहे.
आदित्य ओव्हाळ या युवकाचे नुकतेच म्हणजे साधारण 3 महिन्यांपूर्वीच लग्न झाले असल्याची माहिती मिळत असून आज सकाळी 10:15 च्या दरम्यान इंद्रायणी एक्सप्रेसच्या खाली उडी घेऊन त्याने आत्महत्या केल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून मिळत आहे.
एका सधन कुटुंबातील युवकाने आत्महत्या केल्याने पारगाव, आंधळगाव परीसरात हळ हळ व्यक्त करण्यात येत असून त्या युवकाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजले नाही. संबंधित घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल
तुतारी चिन्ह घ्या किंवा अपक्ष उभे रहा पण निवडणूक लढवा
दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक
विधानसभेची उमेदवारी निष्ठावंतांनाच मिळावी
पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक
फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…