गवंडी कामगाराची मुलगी झाली ‘सेट’ परीक्षा पास

केडगाव (दौंड) : मनात जिद्द असेल तर तुम्ही कोणतेही आव्हान सहज पेलू शकता आणि त्यात सफल होऊ शकता हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गवंडी काम करणाऱ्या एका कामगाराच्या मुलने आपल्या मेहनतीच्या जोरावर सेट परीक्षा पास केली आहे.

केडगाव येथील सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयातील विद्यार्थिनी ललिता रमेश चव्हाण ही इंग्रजी विषयांमध्ये प्राध्यापक पदासाठी पात्रता परीक्षेमध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. तिचे वडील रमेश चव्हाण हे कुसेगाव येथील रहिवाशी असून गवंडी काम व मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. सेट परीक्षा पास करणं सोपं नाही. घरची परिस्थिती बेताची असतानाही या विध्यार्थिनीने आपल्या परिश्रमाच्या जोरावर अखेर ही परीक्षा पास केली आहे.

या विद्यार्थिनीला डॉ. तन्वीर शेख व डॉ. राजेंद्र गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल नेताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शेळके पाटील, सचिव धनाजी शेळके, कार्याध्यक्ष सुनील निंबाळकर व प्राचार्य डॉ. नंदकुमार जाधव यांनी तीचे अभिनंदन केले आहे.