‘मेरी माँ मेरे साथ है’ ची आठवण वैशाली ताईंकडून अजितदादांना भेट

पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अजितदादा पवार विरुद्ध पूर्ण पवार कुटुंब अशा पद्धतीचे चित्र तयार झालं होतं. या काळात अजित पवारांचं ‘मेरी मा मेरे साथ है’ हे वाक्य प्रचंड गाजलं होतं.

निवडणूक काळात देखील मतदान प्रक्रियेवेळी अजित पवारांची आई आशाताई अनंतराव पवार या अजित पवारांसोबत मतदान करायला गेल्याचे पाहायला मिळालं होतं. यावेळी अजित पवारांनी मेरी मा मेरे साथ हे वाक्य वापरलं होतं. आज याच वाक्याच अजित पवार आणि आशाताई आनंदराव पवार यांचा एकत्रित फोटो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे यांनी अजित पवारांना भेट दिला आहे.

वैशालीताई यांनी अजितदादांना आई आणि मुलाचा एकत्रित असणारा फोटो भेट देऊन विधानसभा काळातील त्या आठवणी पुन्हा एकदा जागृत केल्याचे पहायला मिळाले.