Categories: क्राईम

कुरकुंभ मध्ये बनावट देशी दारू विकणारी टोळी जेरबंद ! राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, 7 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

अख्तर काझी

दौंड : दौंड तालुक्यातील कुरकुंभ, पांढरेवाडी गावाच्या हद्दीत बनावट देशी दारूची विक्री करणाऱ्या टोळीला राज्य उत्पादन शुल्क विभाग (दौंड) ने बेड्या ठोकल्या आहेत. सोनू बीसराम कलोशिया (रा. रामनगर बोपखेल तालुका हवेली) शाहरुख दाऊद सय्यद (रा. बंबचाळ ,दौंड) अभिजीत धनंजय लोणकर (रा.पासलकर वस्ती, दौंड) यांना अटक करण्यात आली असून अनिकेत प्रकाश भोसले (रा. बंब चाळ, शालिमार चौक ,दौंड) हा फरार झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पो. नि. विजय रोकडे यांना मिळालेल्या खबरीवरून विभागाच्या भरारी पथकाने (नं 2) दौंड तालुक्यातील कुरकुंभ -पांढरेवाडी गावाच्या हद्दीत सापळा रचून बनावट दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 20 बॉक्स बनावट देशी दारू, एक चार चाकी व एक दुचाकी वाहन असा एकूण 7 लाख 73 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, पुणे विभागाचे उपायुक्त मोहन वर्धे, पुणे जि.चे अधीक्षक चरणसिंग रजपूत, उपाधीक्षक एस. आर. पाटील, युवराज शिंदे, संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि.विजय रोकडे, भरारी पथक क्रमांक दोन चे निरीक्षक अशोक शितोळे, दुय्यम निरक्षक नेवसे, मांजरे, भोसले ,सहाय्यक दुय्यम निरीक्षक दत्ता गवारी, जवान किशन पावडे ,अशोक पाटील, गणेश वावळे, प्रवीण चव्हाण ,अक्षय म्हत्रे ,सागर दुबळे, कोळपे ,नवनाथ पडवळ व होमगार्ड रोहित शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

14 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago