Categories: सामाजिक

उघड्या गटारीत पडली ‘गाय’, दौंड नगर पालिकेकडून आतातरी उघड्या गटारी बंद होतील का ‘माय’..!

अख्तर काझी
दौंड : शहरामधील काही भागांमध्ये दौंड नगरपालिकेच्या गटारी उघड्या ठेवण्यात आल्या आहेत, अशा उघड्या गटारीमध्ये प्राणी पडण्याच्या घटना घडत आहेत. उघड्या गटारीमुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न त्यामुळे आता पुन्हा ऐरणीवर आला आहे.

उघड्या गटारीत गाय पडण्याची अशीच एक घटना दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी परिसरात घडली आहे. या परिसरात वाढलेल्या झाडीमध्ये चरण्यासाठी आलेली गाय उघड्या गटारीमध्ये पडली. हे पाहून स्थानिकांनी येथील प्राणी मित्र निखिल स्वामी यांना ही घटना कळविली. स्वामी त्वरित आपल्या सहकारी मित्रांना घेऊन त्या ठिकाणी पोहोचले आणि तेथील परिस्थिती पाहून त्यांनी लागलीच नगरपालिकेचे अधिकारी शाहू पाटील यांना फोन करून घटनेचे गांभीर्य सांगितले.

शाहू पाटील यांनी त्वरित नगरपालिकेचा जेसीबी मदतीसाठी पाठवून दिला. निखिल स्वामी व मित्रांनी या गाईस गटारीबाहेर काढून तिची सुटका केली. शहरातील ज्या उघड्या गटारीमुळे प्राण्यांना अपघात होत आहेत अशा उघड्या गटारींवर नगरपालिकेने स्लॅब टाकावेत अशी मागणी होत आहे. उघड्या गटारीत पडलेल्या गाईस वाचविण्यासाठी गणेश कांबळे, विकी डाळिंबे, आदित्य शिंदे, श्रेयश सोनवणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

18 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago