भरधाव वाहनाच्या धडकेत ८ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, संतप्त नागरिकांनी चार तास अष्टविनायक महामार्ग रोखून धरला

दौंड : दौंड पाटस रोडवर भरधाव वाहणाच्या धडकेत ८ वर्षीय शालेय विध्यार्थ्याचा मृत्यू झाला. यावेळी संतप्त जमावाने सुमारे चारतास पाटस दौंड अष्टविनायक महामार्ग रोखून धरला होता. यवत पोलिसांनी पिकअप या चारचाकी वाहनाच्या अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अपघाताची फिर्याद मयताचे आजोबा राम कैलास यादव (वयः 55 वर्शे व्यवसायः मजुरी सध्या रा. पासलकर डेअरी, बिरोबावाडी ता. दौंड जि. पुणेमुळ रा. पाली ता. बेनिपटटी जि. मधुबनी राज्य : बिहार) यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि. २८ जून रोजी सकाळी ९:१५ वाजता आरोपी चालक हा पांढऱ्या रंगाची महिंद्रा पिकअप क्र. एम. एच. 42. बी. एफ. 3755 ही हयगई, अविचाराने चालवत जाऊन त्याने बिरोबावाडी (ता. दौंड जि. पुणे) या गावच्या हद्दीत असणाऱ्या पाटस – दौंड हायवे रोडच्या कडेला फिर्यादी नातु आयुश कुमार राजेश यादव (वय ८ वर्षे) हा उभा असताना त्यास समोरून ठोस देवुन अपघात केला. यावेळी या पिक अप गाडीचे पुढील चाक या मुलाच्या अंगावरून त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला.

वाहन चालक आरोपीने अपघाताची खबर न देता तसेच फिर्यादी यांचा नातु याला गंभिर दुखापत झाली असताना सुद्धा त्यास दवाखान्यामध्ये घेवुन न जाता तेथुन पळून गेला. या सर्व प्रकाराने गावकरी संतप्त झाले आणि त्यांनी पाटस दौंड रस्ता अडवून रास्ता रोको केला. यावेळी तब्बल चारतास गावकऱ्यांनी हा रस्ता अडवून धरत आपला संताप व्यक्त केला. घटनास्थळी यवतचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह पोहचून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. या ठिकाणी दौंड तहसीलदार अरुणकुमार शेलार, माजी आमदार रमेश थोरात यांनी भेट देऊन गावाकऱ्यांची समजूत काढली तसेच या ठिकाणी मोठे स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी ही लवकरात लवकर पूर्ण केली जाईल अशी ग्वाही देण्यात आली. घटनेचा अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक संपांगे हे करीत आहेत.