‛विष्णू जाधव’ टोळीतील दोघांवर ‛खंडणीचा’ गुन्हा दाखल

लोणीकाळभोर : दूध व्यावसायिकाला खंडणी मागीतल्याप्रकर्णी विष्णू जाधव टोळीतील दोघांना लोणीकाळभोर पोलिसांनी जेरबंद केले आहे. याबाबत अण्णासाहेब तानाजी खलसे यांनी फिर्याद दिली होती.

तक्रारदार हे लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील कुंजीरवाडी (ता. हवेली जि.पुणे) येथील रहीवासी असुन त्यांचा दुग्ध व्यवसाय आहे. तक्रारदार व त्यांचे भाऊ यांना राजु गायकवाड (रा.शिंदावणे ता.हवेली जि.पुणे) व घनशाम उर्फ गणेश आत्माराम शिंदे (रा. कुंजीरवाडी ता.हवेली जि.पुणे) यांनी दि.०४/१२/२०२१ ते ११/१२/२०२१ दरम्यान वेळोवेळी फोनव्दारे व समक्ष भेटून जेलमधील मोक्यातील आरोपी विष्णु जाधव याचे आम्ही नंबरकारी आहोत असे म्हणून जिवे ठार मारण्याची धमकी देऊन 2 लाख रूपये खंडणीची मागणी करत होते.

याबाबत तक्रारदार यांच्या तक्रारीवरून पडताळणी करून वरील दोन इसमांविरूध्द लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे दि. १३/१२/२०२१ रोजी गुन्हा रजि.नं.६६७/२०२१ भा.द.वि.क.३८७,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी तपास पथक प्रमुख सपोनि राजु महानोर यांना सुचना देवुन आरोपीचा शोध घेणेकामी रवाना केले होते. यावेळी सपोनि राजु महानोर यांनी तपास पथकासह राजेंद्र उर्फ राजु विजय गायकवाड व घनशाम उर्फ गणेश आत्माराम शिंदे यांचा शोध घेवुन त्यांना सापळा रचुन शिताफीने ताबेत घेवुन तात्काळ अटक केली.

गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि राजु महानोर हे करीत असून सदरची उल्लेखनीय कामगिरी नामदेव चव्हाण, (अपर पोलीस आयुक्त,पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर) नम्रता पाटील, (पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५,) बजरंग देसाई (स.पो.आ. हडपसर विभाग,) वपोनी राजेंद्र मोकाशी, सुभाष काळे पोनि (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अधिकारी सपोनि राजु महानोर, पो.हवा नितीन गायकवाड, पो.ना अमित साळुके, श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, संभाजी देविकर, पो.काँ बाजीराव वीर, निखील पवार, शैलेश कुदळे, राजेश दराडे यांचे पथकाने केली आहे.