Categories: क्राईम

दौंड मध्ये महिलेचा विनयभंग आणि तिच्या पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 10 जणांवर अखेर गुन्हा दाखल

दौंड : दौंड शहरामध्ये एका महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी १ ) अक्षय गोरख घोलप, २) कुणाल घोलप, ३) बाबू विजय जमदाडे,४) अजय घोणे ५) महेश घोणे ६) गोरख मच्छिंद्र
घोलप ७) सागर मादेकर ८) श्रीनाथ ननवरे ९) दिपक कांबळे १०) एक आरोपी महिला व इतर ५-१० अनोळखी व्यक्ती (सर्वजण रा. कुंभार गल्ली ता. दौंडजि पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा हा मे. कोर्टाच्या आदेशान्वये की. प्रो.चे. कलम १५६ प्रमाणे दाखल करण्यात आला असुन यातील फिर्यादी महिला (रा. कुंभरगल्ली दौंड) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि. २०/१०/२०२२ रोजी सायंकाळी ६ वा. सुमारास फिर्यादी या त्यांच्या घरातून किराणा आणण्यासाठी दुकानात चालले असताना रस्त्यावर घोळका करून हाता मध्ये तलवार काट्या, गज, दगड, चाकू इत्यादी हत्यारे घेवून आरोपी मज. मोठ मोठ्याने आरडाओरड करून मुस्लीम समाजाच्या नावाने शिवीगाळ करीत
होते. त्यावेळी फिर्यादी या तेथून जात असताना त्यांच्या मधील अक्षय घोलप (आरोपी नं १ ) हा वाईट नजरेने बघून फिर्यादी यांच्या हाताला धरून अंगावर ओढून फिर्यादी यांना मिठी मारली. त्यावेळी वरील सर्व इसमांनी फिर्यादी यांना उद्देशून हे लां.. खूप माजले आहेत यांना सोडू नका. त्यांच्या बायकांना सुद्धा सोडायच्या नाहीत, असे म्हणाले. यावेळी त्यांच्या सोबत असलेले महेश घोणे (आरोपी नं ५ यांनी त्यांना चिथावणी देवून तिला सोडू नका. तिला धरा असे म्हणाल्याने फिर्यादी या घाबरून त्यांच्या घराकडे पळत गेली असता सर्व जमलेले लोक फिर्यादी यांच्या मागे पळत आले, फिर्यादी या घरात गेली असता फिर्यादीया त्यांच्या नवऱ्याला झाला प्रकार सांगत असताना.
त्यातील अक्षय घोलप याने त्याच्या हातातील तलवार कुणाल घोलप याने त्याच्या हातातील कोयता व बाबु जमदाडे याने चाकू, अजय घोणे याने लोखंडी रॉड, महेश घोणे, श्रीनाथ ननवरे यांच्या हातात तलवारी, गोरख घोलप याच्या हातातील कोयत्याने व दिपक कांबळे याने हातातील दगडाने फिर्यादी यांच्या
नवऱ्याला व फिर्यादी यांना मारहाण केली. त्यावेळी हे सर्व लोक त्यांना जीवंत सोडू नका, त्यांना मारुन टाका असे म्हणून फिर्यादी यांच्या नवऱ्याच्या डोक्यावर, तोंडावर शरिरावर जागोजागी मारहाण करत जखमी केले.

त्यावेळी फिर्यादी यांचा आवाज ऐकून त्यांच्या घराशेजारी त्यांचे चुलत दिर सुफियान हे घरी येवून आरोपींपासून त्यांना वाचवत असताना महेश घोणे याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने सुफियान शेख याचे डोक्याला मारहाण करुन तुला जीवे मारुन टाकतो, तुला सोडणार नाही असे म्हणून त्या सर्वांना मारहाण केली त्या मध्ये तो जखमी झाला. त्याच वेळी यातील आरोपी महिलेने फिर्यादी यांना जमिनीवर पाडून फिर्यादी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले. जीवे मारुन टाकू अशी धमकी देवून त्यांच्या जवळील हत्यारे घेवून तेथून निघून गेले असे फिर्यादीत म्हटले आहे. वरील सर्व आरोपींवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

40 मि. ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

23 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago