दौंड : गोमांसचे पदार्थ बनवून विकणाऱ्या आणि स्वतःजवळ गोमांस बाळगणाऱ्या सुफियान कुरेशी (रा.खाटीक गल्ली,दौंड) याच्याविरोधात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम-1976 चे कलम 5ब,9, नुसार दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयुर महादेव घोणे (वय 35 वर्षे, व्यवसाय गोरक्षक रा, कुंभारगल्ली ता.दौंड जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सुफीयान कुरेशी याचे निगाहेकरम नावाने हिंद टॉकीजच्या मागे कसाबगल्ली येथे हॉटेल आहे. या ठिकाणी सुफीयान कुरेशी हा गोमांस पासून बनवलेले पदार्थाची विक्री करीत होता तसेच कच्चे गोमांस हॉटेलमध्ये ठेवलेल्या अवस्थेत मिळून आल्याने फिर्यादीने सुफीयान कुरेशी याच्या विरुद्ध तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीकडून 8,000/- रुपये किंमतीचे 40 किलो कच्चे गोमांस व त्यापासून बनवलेले पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. घटनेचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार वाबळे करीत आहेत.