वैशाली नागवडे यांना मारहाण करणाऱ्या ‘त्या’ तिघांवर गुन्हा दाखल

पुणे

महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी आता तीन जणांवर मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसवराज तिकोने, प्रमोद कोंढरे, मयूर गांधी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे असून डेक्कन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वैशाली नागवडे यांनी तक्रार दिली होती.

वैशाली नागवडे यांना झालेल्या मारहाणीचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत होता. आरोपिंवर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली होती.
काल पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे पदाधिकारी बसले असल्याने या ठिकाणी जोरदार राड्याला सुरुवात झाली होती. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांसमोर येऊन घोषणाबाजीला सुरुवात झाली त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलीस बाहेर घेऊन जात असताना भाजपच्या कार्यकर्त्यानी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना व अध्यक्षा वैशाली नागवडे यांना मारहाण केली. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

या मारहाणीत वैशाली नागवडे यांच्या डोक्याला व कानाला मार लागला असल्याने त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

19 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago