Burn Car | अपघातग्रस्त ऑडी कार पेटवल्या प्रकरणी यवत पोलिसांकडून 9 जणांवर गुन्हा दाखल

दौंड | दौंड पाटस रोडवर अपघातानंतर ऑडी कार पेटवून देणाऱ्या 9 जणांवर यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक हनुमंत भाउसाहेब भगत ( यवत पोलीस स्टेशन) यांनी स्वतः फिर्याद दिली आहे.

संतप्त जमावाने पेटवलेली ऑडी कार

1) मयुर अंकुश गावडे 2) मनोज उर्फे मुन्ना अजिनाथ घटकळ 3) संजु विलास वायाळ 4) रोहन मुकेश गावडे 5) सोमनाथ दत्तु गावडे (सर्व रा.बिरोबावाडी ता.दौंड जि.पुणे) व इतर 4 इसम अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार दि. 24/06/2023 रोजी सकाळी 11ः00 वाजण्याच्या सुमारास बिरोबावाडी (ता.दौंड जि.पुणे) या गावाच्या हददीत पाटस ते दौड रोडवरती तळाचा पाण्याचा ओढा येथे अपघातग्रस्त आॅडी कंपनीची कार नं एम.एच 02 सी.व्ही 4898 हीने अपघात केल्याचे कारणावरुन वरील 9 जणांनी बेकायदा गर्दी, जमाव जमवुन सदर गाडीवर पेट्रोल टाकुन तिचे नुकसान करण्याच्या हेतूने ती जाळून टाकली होती. त्यामुळे पोलीस नाईक भगत यांच्या फिर्यादीनुसार वरील 9 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेत दाखल अमंलदार पो.ना जाधव असून तपासी अमंलदार पोसई नागरगोजे हे प्रभारी अधिकारी हेमंत शेडगे (पोलीस निरीक्षक यवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.