Categories: क्राईम

वरवंड येथे माती चोरी करणाऱ्या 5 जणांवर गुन्हा दाखल, 25 लाखांचा मुद्देमाल जप्त

वरवंड / दौंड : दौंड तालुक्यातील वरवंड येथे शेतामध्ये जेसीबी आणि ट्रक च्या सहाय्याने माती चोरी करणाऱ्या 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार संदीप सुरेश देवकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजकुमार कन्हय्या महातू (वरवंड) श्रीकांत विधुर कसबे (बोरिपार्धी) बंडू दिवेकर (वरवंड) सोमनाथ दत्तात्रय कुंजीर (कडेठाण) तुषार जगताप (देऊळगाव गाडा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माती चोरी करताना पकडलेल्या मुद्देमालाची किंमत 25 लाख असल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वरंवड येथील शेतजमीनमध्ये रात्रीच्या वेळी जेसीबी च्या सहाय्याने चोरून माती काढली जात असून ती हायवा ट्रक च्या सहाय्याने भरून घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

यवत पोलिसांनी रात्री एक वाजता सदरील शेतजमीनीत जाऊन बेकायदा माती उत्खनन करणाऱ्या जे.सी. बी नं. एम एच ४२ ए एक्स १८६६ आणि माती भरून नेणाऱ्या हायवा ट्रक नंबर एम. एच १२ एस. एफ २४२८ या वाहनांना घटनास्थळी चोरी करत असताना पकडले. वरील सर्व आरोपिंवर कलम 379 तसेच कलम पर्यावरण संरक्षण अधिनियम 1956 च्या कलम 9,15 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

11 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago