विवाहितेच्या छळवणूक प्रकरणी दौंड मध्ये पतीसह संपूर्ण कुटुंबीयांवर गुन्हा दाखल

दौंड : बाहेरील महिलेशी अनैतिक संबंध ठेवून स्वतःच्या पत्नीला माहेरून पैसे आणावेत म्हणून तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्या प्रकरणी पतीसह त्याच्या नातलगांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती विशाल महिंद्र पाळेकर, सासू मंगल महिंद्र पाळेकर, शंकर महिंद्र पाळेकर, सीमा विजय सोनवणे, नीलम सागर चितारे अशी गुन्हा दाखल आरोपींची नावे आहेत. श्रुती विशाल पाळेकर(रा. चैतन्य हॉस्पिटल, पोस्ट ऑफिस शेजारी दौंड, सध्या,रा. मीरा सोसायटी दौंड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार मार्च 2017 ते जुलै 2022 दरम्यान फिर्यादी यांचा पतीसह त्यांच्या नातलगांनी छळ केला आहे. बाहेरील महिलेशी अनैतिक संबंध ठेवून पती कडून पीडितेचा छळ करण्यात येत होता, घरासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तुझ्या वडिलांना सांग असे म्हणून फिर्यादी यांना राहत्या घरातील खोलीत उपाशी ठेवून त्यांना मारहाण केली जात होती. दौंड पोलिसांनी आरोपींविरोधात भा. द.वि. 498 अ,323,504,506,34 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.