धनगर समाजाला मोठा धक्का | सुप्रीम कोर्टाने ‘एसटी’ प्रवर्गातून आरक्षणाची याचिका फेटाळली

दिल्ली : धनगर बांधवांसाठी एक दुःखद बातमी असून धनगर समाजाची एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.
धनगर समाजाच्या वतीने याचिका कर्त्यांनी धनगर आणि धनगड हा शब्द एक असून त्यामुळे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे अश्या आशयाची याचिका सुप्रीम कोर्टमध्ये दाखल केली होती. मात्र या अगोदर धनगर आणि धनगड हे वेगवेगळे असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. सुप्रीम कोर्टमध्ये दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावत मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे.

बारामतीत सुनेत्रा पवार हारणार असे आशिष शेलार म्हणताच एकच खळबळ माजली, नंतर सारवासारव केली.. पहा व्हिडीओ

काय आहे नेमके प्रकरण – ज्यावेळी भारतीय राज्यघटना तयार झाली त्यावेळी अनुसूचित जमातींची सूची तयार करण्यात आली होती. यामध्ये संसदेने 1976 पर्यंत वेगवेगळ्या सुधारणा केल्या होत्या. धनगड आणि धनगर हे एकच असून महाराष्ट्रात धनगड ही जमात अस्तित्वात नाही तर धनगर हेच धनगड आहेत फक्त ‘ड’ चा ‘र’ असा फरक झाला आहे त्यामुळे धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावे अशी मागणी याचिका कर्त्यांची होती.

ती याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावत धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळणार नाही असा निकाल उच्च न्यायालयाने दिला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात धनगर समाजाच्या याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टानेही उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला असल्याने धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला मोठा धक्का बसला आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

10 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago