Big News : वाझे ने घेतले उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव! अजित पवारांनी दिली अशी सडेतोड प्रतिक्रिया



– सहकारनामा

पुणे : राज्यात सध्या दोन गोष्टी मोठ्याप्रमाणावर गाजत आहे, एक म्हणजे कोरोना आणि दुसरी म्हणजे महाविकास आघाडीतील दररोज एक एक नेत्यांवर पोलीस आयुक्त आणि अधिकाऱ्यांकडून होत असलेले आरोप सत्र आणि त्या आरोपांना धरून विरोधी पक्षाकडून होणारी सत्ताधारी गटाची कोंडी.. मात्र यावेळी सचिन वाझे ने संपूर्ण महाराष्ट्रात आपली एक वेगळी छाप असणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांचेच नाव घेतल्याने आता वातावरण चांगलेच तापले आहे.

अँटिलीया प्रकरणात अटक केलेल्या निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याच्या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या नावाचा उल्लेख केल्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. 

गुरुवारी पंढरपुरात उपमुख्यमंत्री म्हणाले की वाजे यांचे पत्र पाहून मला हसू आवरले नाही, कारण  मी वाजे यांना कधी भेटलो नाही आणि त्यांच्याशी कधी बोललो नाही. वाझे यांचा हा आरोप खोटा आहे. आणि याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे म्हणजे ‛दुध का दूध, और पाणी का पाणी’ होऊन जाईल.  उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी पुढे म्हणाले की सरकार चालवताना त्याच्या कारभारामध्ये माझी खूप कठोर भूमिका असते हे सर्वांना माहीत आहे.

यावेळी अजित पवारांनी विरोधीपक्षावर निशाणा साधताना विरोधकांना हे सरकार अस्थिर करायचे आहे त्यामुळे मोठा खटाटोप चालला आहे, वाजे यांचे पत्र येण्यापूर्वी तीन दिवस अगोदरच भाजपच्या नेत्यांना कसे माहीत असते? की आता अमुक मंत्र्यांची विकेट पडेल आणि याचे नाव पुढे येईल? त्यामुळे हे जे काही सुरू आहे ते राज्यातील महाविकस आघाडी सरकार अस्थिर करण्याचा एक प्रयत्न सुरू आहे.  

वाझे यांनी पत्रात असा दावा केला आहे की, उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीने मला फोन करून अवैध रीतीने गुटख्याचा पुरवठा  करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून पैसे गोळा करण्यास सांगितले होते, पण मी वसुली करण्यास नकार दिला. 

यावर अजित पवारांनी माहिती देताना हे सर्व हास्यास्पद असून ज्याने तो फोन करून मी असे सांगितले असे सांगितले जातेय त्याची आवाजाची आणि फोन ची संपूर्ण चौकशी व्हावी आणि त्यातून मग दूध का दूध, आणि पाणी का पाणी समोर येईल असे सांगितले.