दौंड : दौंड तालुक्यातील लडकतवाडी येथे बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका 17 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत यवत पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेची फिर्याद मयताचा चुलतभाऊ महेश रोहिदास दुर्गे (रा.लडकतवाडी ता. दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महेश दुर्गे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.02/12/2023 रोजी सायंकाळी 4ः40 सुमारास त्यांची आई शकुंतला दुर्गे यांनी त्यांना फोन करून विनायक उर्फ बाळा दुर्गे याने लडकतवाडी येथील गवळीबा मंदिरात नायलाॅन दोरीचे सहाय्याने फाशी घेतली असल्याचे सांगितले. त्यामुळे फिर्यादी यांनी त्वरीत वरंवड येथुन लडकतवाडी येथील गवळीबा मंदिरात येऊन पाहणी केली असता त्यांचा चुलत भाउ विनायक उर्फ बाळा नवनाथ दुर्गे याने गवळीबा मंदिरातील हुकाला नायलाॅन दोरीचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी डायल 112 वर काॅल करुन पोलीसांना याची माहिती दिली.
घटनास्थळी पोलीस आल्यानंतर मयत विनायक उर्फ बाळा यास खाली घेवुन अॅम्ब्युलन्समधुन यवत ग्रामीण रुग्णालय येथे घेवुन जाण्यात आले. यावेळी सरकारी डाॅक्टरांनी विनायक उर्फ बाळा दुर्गे हा उपचारापुर्वीच मयत झाल्याचे सांगितले. घटनेचा अधिक तपास पोसई शेळके करीत आहेत.