आम्ही केडगावकर शिबिरात 351 रक्तदात्यांकडून ‘रक्तदान’

केडगाव (दौंड) : दौंड तालुक्यातील केडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आम्ही केडगावकर’ या शिबिरामध्ये 351 रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हिडिओ कॉल करून शुभेच्छा दिल्या.

‘आम्ही केडगावकर’ या ग्रुप च्या माध्यमातून हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. गेल्या वर्षीही त्यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या शिबिराला दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात, जेष्ठ नेते महेश भागवत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब कापरे, दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप हंडाळ, मयूर सोळसकर, हर्षल भटवेरा, डॉक्टर वंदना मोहिते, डॉक्टर पार्थ गायकवाड, डॉक्टर कदम, जेष्ठ मार्गदर्शक डॉक्टर धिरेद्रं मोहन, मनोज गुंदेचा, सरपंच पुनम बारवकर यांचे पती गौरव बारवकर, ग्रामपंचायत सदस्य संदीप राऊत, महेश म्हेत्रे, निलेश कुंभार, यांनी शिबिराला भेट दिली.

प्रसिद्ध फोटोग्राफर सचिन गायकवाड आणि त्यांच्या पत्नी नंदिनी गायकवाड यांनीही येथे रक्तदान केले. ते सलग पाच वर्षे रक्तदान करत आले आहेत. विकास राऊत आणि रूपाली राऊत या जोडीने सुद्धा रक्तदान केले. या शिबिराला महिलांचा चांगला प्रतिसाद लाभला. केडगाव येथील अनेक नागरिकांनी याठिकाणी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली.

या कार्यक्रमाचे संयोजन केडगाव ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप, धनराज मासाळ प्रीतम गांधी, आशिष नहाटा, मनोज, पोखरणा, संदीप कोठारी, समीर थोरात, अविनाश खुंटे, सलमान खान, फैज सय्यद, वसीम बेग, समिर डफेदार, प्रशांत कुदळे वैभव सूर्यवंशी, अर्षद शिकिलकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी केडगावमधील सर्व संघटनांनी आयोजक म्हणून काम केले, व्यापारी संघटनेने यामध्ये महत्त्वाचे सहकार्य केले तर नवकार ग्रुप डेव्हलपर्स यांनी जागा उपलब्ध करून दिली.