केडगावच्या युवकाचा बनतोय गाण्याचा अल्बम

केडगाव : स्वतःचा व्यवसाय सांभाळून आपला छंद ही जोपासला तर त्यास उशीरा का होईना पण यश नक्की मिळते. अशीच एक कला अंगीकारलेल्या महेश सातव याला याचा अनुभव आला आहे. महेश सातव याला गाणे लिहिण्याचा छंद होता आणि त्याच्या या छंदाला आता संगीत संयोजक ओंकार नवले यांची साथ मिळाली आहे.

केडगाव ता. दौंड येथे महेश सातव याचे साईकृपा हॉटेल आहे. हा हॉटेल व्यवसाय सांभाळत तो आपला गाणी लिहिण्याचा छंद जोपासतो. त्याच्या या कलेला संगीत संयोजक ओंकार नवले यांनी वाव देत ‘तुझसे मिलने की इजाजत है’ ह्या गाण्याचा अल्बम काढण्याचे ठरवले आहे. ह्या अल्बमच्या माध्यमातून महेश आता संगीत क्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज होत आहे. ओंकार नवले हे पुणे येथील प्रसिद्ध संगीत संयोजक असून त्यांनी महेश सोबत म्युझिकल प्रोजेक्ट सादर करण्याचे ठरवले आहेअसल्याची माहिती महेश सातव याने दिली आहे.

वडिलांचे मार्गदर्शन आणि मित्रांचे प्रोत्साहन यामुळेच ही अनमोल संधी आपल्याला मिळत असल्याचे महेश सांगतो. संगीत क्षेत्रातील महेशच्या ही कामगिरी केडगाव पंचक्रोशीत कौतुकाचा विषय ठरत असून दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनीही महेशच्या या कामगिरीबद्दल त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.