– सहकारनामा
पुणे :
पुणे जिल्हयात घरफोड्या करणारे खुनासह दरोडा व घरफोडी चोरीचे तब्बल २७ गुन्हे दाखल असलेले दोघे सराईत अट्टल चोरटे जेरबंद : घरफोडीचे ११ गुन्हे उघडकीस : पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी
दिनांक २६/३/२०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ०१.०० वा. चे दरम्यान भिवरी ता.पुरंदर गावचे हद्दीत फिर्यादी सोपान मारुती भिसे (वय ५० रा.भिवरी ता.पुरंदर जि.पुणे) हे घराला कुलूप लावून बाहेर गेलेले असताना बंद घराचे कुलुप कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडुन घरामध्ये प्रवेश करुन कपाटामधील ठेवलेले सुमार १४ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम १०,०००/- असा एकूण ५,९०,०००/- (पाच लाख नव्वद हजार) रुपयाचा ऐवज चोरुन नेलेला होता. त्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सासवड पो.स्टे. गु.र.नं. १२६/२०२१ भादंवि क.४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत करणेबाबत पुणे जिल्हयाचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले पथकाने तपास सुरु केला. घटनास्थळी भेट देवून गुन्हयाची माहिती काढून तपास करीत असताना प्राप्त झालेल्या सीसी टीव्ही फुटेजवरुन सदरचा गुन्हा हा यापूर्वीचा रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय अवचिते यानेच केला असल्याची खात्री पोलिसांना झाली. त्यावरुन आरोपी अजय अवचिते याचे राहण्याच्या ठिकाणची माहिती काढून ढवळगाव, आलेगाव पागा, तांदूळवाडी, खेंगरेवाडी, म्हाडा कॉलनी, लोहियानगर, पुणे, चिंचवड, घोरपडी, कोरेगाव पार्क या ठिकाणी जावून त्याचा शोध घेतला गेला परंतु तो मिळून येत नव्हता.
आज रोजी गुन्हे शाखेचे पथकास आरोपी अजय अवचिते व त्याचा एक साथीदार सासवड येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्यामुळे पोलिसांनी वेषांतर करून त्या ठिकाणी जाऊन आरोपी अजय राजू अवचिते (वय २७ वर्षे रा.आलेगाव पागा, ता.शिरुर जि.पुणे) व त्या सोबतचा साथीदार गणेश उर्फ ठोम्या गौतम भोसले (वय २७ वर्षे आलेगाव पागा, ता.शिरुर जि.पुणे) यांना सापळा रचून ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींकडे अधिक चौकशी केली असता अजय अवचिते याने त्याचा साथीदार मेहुणा गणेश उर्फ ठोम्या गौतम भोसले व पत्नी सिमा अजय अवचिते दोघे रा.आलेगाव पागा, ता.शिरुर जि.पुणे असे तिघे मिळून घरफोडया चो-या करण्यासाठी जायचे व पत्नी सिमा अवचिते ही चोरी करतेवेळी टेहळणीसाठी थांबायची असे सांगितले. तसेच या तिन्ही आरोपींनी एकत्र मिळून दौंड, कोडीत, भिवरी, सासवड जयदिप कार्यालयजवळ व म्हाडा कॉलनी, फोंडवाडा, किरकटवाडी, भिगवण, बोरीपार्धी, नगर रोड एल अँड टी फाटा गॅस गोडावूनचे जवळ या ठिकाणी बंद घराचे कूलूप कडीकोयंडा तोडून चोरी केल्याचे तसेच बजरंगवाडी येथे चोरी करण्यासाठी कूलूप तोडले परंतु लोक जागे झालेने पळून गेलेबाबत सांगितले.
त्याबाबत पोलीस स्टेशनकडील रेकॉर्डची पडताळणी केली असता खालीलप्रमाणे एकूण ११ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
१) शिक्रापूर पो.स्टे . गु.र.नं.२९/२०२१ भादंवि क.४५७,३८० (एल अँड टी फाटा गॅस गोडावून मागे)
२) यवत पो.स्टे. गु.र.नं. ३०/२०२१ भादंवि क.४५४,३८० (बोरीपार्थी ता.दौंड)
३) भिगवण पो.स्टे . गु.र.नं.१८/२०२१ भादंवि क.४५४,४५७,३८० (भिगवण ता.इंदापूर)
४) हवेली पो.स्टे. गु.र.नं. १२/२०२१ भादंवि क.४५४,४५७,३८० (किरकटवाडी ता.हवेली)
५) वडगाव निंबाळकर पो.स्टे. गु.र.नं.२७/२०२१ भादंवि क.४५७,३८० (फोंडवाड ता.बारामती)
६) सासवड पो.स्टे. गु.र.नं. ३४/२०२१ भादंवि क.४५७,३८० (सासवड म्हाडा कॉलनी)
७) सासवड पो.स्टे . गु.र.नं. ७४/२०२१ भादंवि क .४५४,४५७,३८० (सासवड)
८) वडगाव निंबाळकर पो.स्टे. गु.र.नं.७४/२०२१ भादंवि क.४५७,३८०,५११ (बजरंगवाडी ता.बारामती)
९) सासवड पो.स्टे . गु.र.नं.१२६/२०२१ भादंवि क.४५४,३८० (भिवरी ता.पुरंधर)
१०) सासवड पो.स्टे . गु.र.नं.१२८/२०२१ भादंवि क.४५४,३८० (कोडीत खुर्द ता.पुरंधर)
११) दौंड पो.स्टे. गु.र.नं. १६७/२०२१ भादंवि क .४५४,३८० (दौंड )
सदर आरोपींकडून घरफोडी चोरीचे वरीलप्रमाणे एकूण ११ गुन्हे उघडकीस आणून १३ तोळे ८ ग्रॅम सोन्याचे दागिने व ९ तोळे ४ ग्रॅम चांदीचे दागिने व एक गॅस सिलेंडर असा किं. ५,३७,६००/- रुपयाचा मला जप्त करण्यात आलेला आहे.
दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत अट्टल गुन्हेगार असून त्यांचेवर यापूर्वी हडपसर, लोणीकाळभोर, जेजूरी , बारामती शहर, बारामती तालुका, सासवड, भिगवण, खेड, यवत, शिरुर या पोलीस स्टेशनला खुनासह दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी इत्यादी प्रकारचे एकूण १९ गुन्हे दाखल आहेत.
आरोपी अजय राजू अवचिते याचेवर यापूर्वी खालीलप्रमाणे एकूण १९ गुन्हे दाखल आहेत.
१) हडपसर पो.स्टे. गु.र.नं. ७/२०१२ भादंवि क.३९२,३४
२) लोणीकाळभोर पो.स्टे . गु.र.नं. ४४/२०२० भादंवि क.४५७,३८०
३) लोणीकाळभोर पो.स्टे. गु.र.नं.५०७/२०२० भादंवि क.४५७,३८०
४) जेजूरी पो.स्टे. गु.र.नं.१३१/२०१७ भादंवि क.४५४,३८०,३४
५) जेजूरी पो.स्टे. गु.र.नं.१३४/२०१८ भादंवि क.४५७,३८०,३४
६) जेजूरी पो.स्टे. गु.र.नं.१३६/२०१८ भादंवि क.४५७,३८०,३४
७) जेजूरी पो.स्टे. गु.र.नं.१७६/२०१८ भादंवि क.४५७,३८०,३४
८) जेजूरी पो.स्टे. गु.र.नं.१ ९२/२०१८ भादंवि क.४५७,३८०,३४
९) बारामती शहर पो.स्टे. गु.र.नं.९ ३ / २०१० भादंवि क.३७ ९
१०) बारामती शहर पो.स्टे. गु.र.नं.१०४/२०१० भादंवि क.३७९,३४
११) बारामती शहर पो.स्टे. गु.र.नं.६४८/२०१७ भादंवि क.३७९
१२) बारामती तालुका पो.स्टे. गु.र.नं.१७७/२०१३ भादंवि क.३७९, ३४
१३) बारामती तालुका पो.स्टे. गु.र.नं.१७७/२०१४ भादंवि क .३७९, ३४
१४) बारामती तालुका पो.स्टे. गु.र.नं.३९८/२०१५ भादंवि क.३६३,३६७,३२६,५०४,५०६
१५) बारामती तालुका पो.स्टे. गु.र.नं.५१/२०१७ भादंवि क.१४३,१४७,१४८,३२४
१६) भिगवण पो.स्टे. गु.र.नं.१४८/२०१६ भादंवि क.३७९,३४
१७) खेड पो.स्टे. गु.र.नं.३४१/२०१८ भादंवि क.४५४,३८०
१८) यवत पो.स्टे. गु.र.नं .४६/२०१९ भादंवि क.४५४,३८०
१९) यवत पो.स्टे. गु.र.नं .१८२/२०२० भादंवि क.३२४
आरोपी गणेश उर्फ ठोम्या गौतम भोसले याचेवर यापूर्वी खालीलप्रमाणे एकूण ८ गुन्हे दाखल आहेत.
१) शिरुर पो.स्टे. गु.र.नं.४०३/२०१५ भादंवि क.३९६,३९५
२) जेजूरी पो.स्टे. गु.र.नं.१३१/२०१७ भादंवि क.४५४,३८०,३४
३) जेजूरी पो.स्टे. गु.र.नं.१३४/२०१८ भादंवि क.४५७,३८०,३४
४) जेजूरी पो.स्टे. गु.र.नं.१३६/२०१८ भादंवि क.४५७,३८०,३४
५) जेजूरी पो.स्टे. गु.र.नं.१७६/२०१८ भादंवि क.४५७,३८०,३४
६) जेजूरी पो.स्टे. गु.र.नं.१९२/२०१८ भादंवि क.४५७,३८०,३४
७) लोणीकाळभोर पो.स्टे. गु.र.नं.७४/२०१२ भादंवि क.४५७,३८०
८) लोणीकाळभोर पो.स्टे. गु.र.नं.४६३/२०१२ भादंवि क.४५७,३८०
दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी सासवड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती अपर पोलिस अधिक्षक श्री.मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट,
सहा.पो.नि. सचिन काळे,
पोहवा. चंद्रकांत झेंडे,
पोहवा. महेश गायकवाड,
पोहवा. निलेश कदम,
पोहवा. सचिन गायकवाड, पोहवा. सुभाष राऊत, पो.ना. गुरू गायकवाड, पो.ना. सागर चंद्रशेखर,चा.पोहवा. काशिनाथ राजापुरे यांनी केलेली आहे.