– सहकारनामा
पुणे :
सध्या पुणे जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर कोरोना रुग्ण वाढत चालले आहेत. अनेकांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ येत असून अशावेळी या रुग्णांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन हे नवसंजीवनी देणारे ठरत आहे त्यामुळे डॉक्टरांकडून रुग्णांना हे इंजेक्शन आवर्जून दिले जाते.
मात्र या कठीण काळातही काहीजण या इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याचे समोर येत असून या इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी दोघांना पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक आरोपींमध्ये एका हॉस्पिटलच्या नर्सचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी कोरोनावरील प्रभावी असणारे रेमडेसिव्हीर हे इंजेक्शन जास्त किमतीला विकताना ही कारवाई केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये पृथ्वीराज मुळीक आणि नीलिमा घोडेकर या डोन आरोपींचा समावेश आहे.
रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजर करण्यात येत असून भारती विद्यापीठ परिसरात एकजण हे इंजेक्शन जास्त भावात विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानंतर पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून इंजेक्शनचे जास्त पैसे घेत असताना अगोदर पृथ्वीराज मुळीक यास अटक केली नंतर त्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हे इंजेक्शन त्याची ओळख असणाऱ्या नीलिमा घोडेकर हिच्याकडून घेत असल्याचे सांगितले. पोलिसांनी नीलिमा ची माहिती काढली असता ती पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर पोलिसांनी तिच्यावरही गुन्हा दाखल करून तिलाही अटक केली आहे.
पुणे शहरात होत असलेला रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे आणि असले प्रकार आढळतात त्यांच्याकडून गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
हाती घेतली आहे.