दौंड : मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आणि जरांगे यांच्याबद्दल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ दौंड तालुक्यातील कुसेगाव येथे छगन भुजबळ यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध करणाऱ्या 14 जणांवर बेेेकायदेशीर जमावाचा सभासद असणे व मा.जिल्हाधिकारी साो यांच्या आदेशाचा भंग करणे, भादवि 143 या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणेश महादेव मुटेकर (वय 36 वर्षे पोलीस काॅन्टेबल, यवत पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे.
यवत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपिंमध्ये
1) मनेष शिवाजी शितोळे
2) मनोज वसंतराव फडतरे
3) हनुमंत सतिश शितोळे
4) सागर बाळासाहेब शितोळे
5) विशाल अनिल शितोळे
6) सौरभ बाळासाहेब शितोळे
7) संतोष हनुमंत शितेाळे
8) महेश त्रींबक शितोळे
9) किरण मारुती शितोळे
10) धिरज लक्ष्मन शितोळे
11) संतोष व्यंकट शितोळे
12) प्रभाकर मधुकर शितोळे
13) मोहन विनायक शितोळे
14) संतोष सदाशिव शितोळे
सर्व (रा कुसेगाव ता दौड जि पुणे) या चौदा जणांचा समावेश आहे.
यवत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि 19 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 09:30 वाजता यातील वरील आरोपी यांनी निषेध सभेची परवानगी न घेता कुसेगाव येथे बेकायदेशीर जमाव जमवला. तसेच अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आरक्षणाबाबत संभाषण केल्याच्या कारणावरून त्यांच्या अंत्यविधीची प्रतिकात्मक ताटी बांधुन छगन भुजबळ मुर्दाबाद व विविध घोषणा दिल्या. हे कृत्य मा. जिल्हाधिकारी साो. पुणे यांचे जमावबंदी आदेषाचा भंग करत असल्याने त्यांच्याविरुद्ध विविध कलमांखाली यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.