– सहकारनामा
पुणे : शिरूर तालुक्यातील मांडवगण येथे अवैधरीतीने गुटख्याचा साठा बाळगून त्याची विक्री करणाऱ्या इसमास पुणे ग्रामिणच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 12 /4 /2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडिल पोलीस पथक शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत वॉन्टेड व फरार आरोपींचा शोध घेत असताना त्यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की मांडवगन (ता.शिरूर) या गावात स्वप्नील राजमल धोका हा व्यक्ती आपले कब्जात प्रतिबंधित करण्यात आलेला पान मसाला सुगंधी तंबाखू व गुटखा याची बेकायदेशीररित्या साठवण करून विक्री करत आहे.
या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन मांडवगण फराटा येथे जाऊन स्वप्निल राजमल धोका याचे राहते घराची पंचासमक्ष घरझडती घेतली असता त्यामध्ये पन्नास हजार तीनशे पन्नास (50350/-) रूपये किमतीचा प्रतिबंधित करण्यात आलेला पान मसाला सुगंधी तंबाखू चा माल मिळून आला. पोलिसांकडून त्याचे विरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 188 ,272 ,273 सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे कलम 30 (2)(I),26(2)(प),26(2)(पअ)कलम59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास पुढील तपास कामी शिरूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही मा पोलिस अधिक्षक
श्री डॉ अभिनव देशमुख सो, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते सो यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री पद्माकर घनवट
सपोनि श्री सचिन काळे ,स फौ दत्तात्रय गिरमकर ,पो.हवा. जनार्दन शेळके , पो.हवा.उमाकांत कुंजीर,पो ना राजू मोमिन ,पो.ना अजित भुजबळ ,पो.ना मंगेश थिगळे, पो कॉ अक्षय नवले पो.कॉ.समाधान नाईक नवरे यांनी केली आहे.