सुधीर गोखले
सांगली : दिवाळी म्हणले कि आपल्या समोर फराळाची यादी उभी रहाते मग तो खमंग चिवडा असेल किंवा खुसखुशीत चकली असेल बालगोपाळांच्या आवडीची मिठाई तर फक्त ‘बसाप्पा हलवाई’ कडेच अशी आता शतकी परंपराच झाली आहे.
कोणत्याही सणामध्ये किंवा अगदी १५ ऑगस्ट किंवा प्रजासत्ताक दिनानिमित्त वाटप होणाऱ्या खास जिलेबी साठी सांगली जिल्ह्यातील शतकी परंपरा असलेले ‘बसाप्पा हलवाई’ हे चोखंदळ ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले मिठाई दुकान आपल्या सहा शाखांद्वारे ग्राहक सेवेमध्ये असल्याचे या बसाप्पा चे संचालक मयूर आणि नितीन चौगुले यांनी ‘सहकारनामा’शी बोलताना सांगितले.
गेल्या शंभर वर्षांहूनही अधिक काळ आम्ही मिठाई उत्पादन क्षेत्रामध्ये ग्राहक सेवा देत आहोत तसेच आपल्या देशातील प्रत्येक प्रांतानुसार आमच्याकडे मिठाई बनवली जाते त्यामुळे आमच्या कडे मिठाईच्या असंख्य व्हरायटी आपल्याला पहायला मिळतील असेही त्यांनी यावेळी नमूद केले.