नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये | आमचे उमेदवार ताकदीने उभे, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने अफवांचा बाजार – मनोज (संताजी) शेळके

केडगाव (दौंड) : दौंड तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नवनवीन डावपेच आणि राजकीय कुरखोड्यांना उधाण आले आहे. या उमेदवाराने त्या उमेदवाराला पाठिंबा दिला, त्या उमेदवाराने या उमेदवाराला पाठिंबा दिला अश्या अफ़वा विरोधी पार्ट्या पसरवत असून मतदार राजा, नागरिकांनी या अफवेला बळी पडू नये असे आवाहन मनोज संताजी शेळके यांनी केले आहे.

अफ़वा पसरवून नागरिकांमध्ये संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न.. केडगाव येथे काही विरोधकांनी मनोज शेळके यांनी अमुक-तमुक उमेदवाराला पाठिंबा दिला अशी अफ़वा पसरवली त्यामुळे त्यांना अनेक फोन येऊ लागले. त्यांनी याबाबत खुलासा करताना, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे ते आता खोट्या अफ़वा पसरवत आहेत. कुणीही त्यांच्या अफ़वांना बळी पडू नये. आमच्या उमेदवार सौ. वनिता संताजी उर्फ मनोज शेळके यांनी कुणालाही पाठिंबा दिला नाही. उलट त्यांना अनेकांचे समर्थन मिळू लागल्याने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते अफ़वा पसरवून लोकांमध्ये कसा संभ्रम निर्माण करता येईल याचा प्रयत्न करत असल्याचे शेवटी मनोज शेळके यांनी सहकारनामाशी बोलताना सांगितले.