‘बाळासो कापरे’ तुमचा हा दुटप्पीपणा थांबवा.. थेट व्हिडीओ आणि फोटोतून केली पोलखोल, ‘वनिता शेळके’ यांना वाढता पाठिंबा : मनोज (संताजी) शेळके

राजकीय घमासान

केडगाव (दौंड) : केडगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. येथे ग्रामविकास परिवर्तन पॅनल (थोरात गट) जनसेवा ग्रामविकास पॅनल (कुल गट) आणि केडगाव विकास आघाडी (बाळासो कापरे) गट हे तीन प्रमुख पॅनलमध्ये कमालीची चुरस पहायला मिळत आहे. प्रचारात आणि पाठिंब्यात वनिता मनोज (संताजी) शेळके यांनी आघाडी घेतल्याचा दावा ग्रामविकास परिवर्तन पॅनलकडून करण्यात येत असून त्यांच्याकडून बाळासो कापरे आणि सत्ताधारी जनसेवा विकास पॅनल (कुल गट) च्या विकासाच्या दाव्याची पोलखोल सुरु करण्यात आली आहे.

https://youtu.be/iQLS1yz_X24?si=pNHMg5Od5Ikpl5ni
मागील ग्रामपंचायत निवडणूक प्रचारात ‘बाळासो कापरे’ कुल गटाचा प्रचार करतानाची ही बातमी ग्रामविकास परिवर्तन पॅनल दाखवत आहे

प्रचाराच्या रणधुमाळीत कापरे यांनी सत्ताधारी गटावर आरोप करत दहा वर्षे केडगावचा विकास खुटला असल्याचे म्हटले आहे. तर त्यांच्या या आरोपाचा थोरात गटाचे मनोज उर्फ संताजी शेळके यांनी खरपूस समाचार घेतला असून तुम्हीच कुल गटाच्या सरपंचांचा प्रचार केला, निवडून द्या म्हणाला, सत्तेत सहभागी झाला आणि आता तुम्हीच म्हणता दहा वर्षे विकास झाला नाही. आम्ही ठामपणे म्हणतो की विकास झाला नाही, भ्रष्टाचार झाला मात्र तुमचा दुटप्पीपणा पण लोकांसमोर आला आहे. जनता तुमच्या भाषनांना विसरली नाहीये, तुम्ही ज्यांच्यावर टिका करत आहात त्यांचा प्रचार तुम्हीच केला आणि सत्ता भोगली हे तुम्ही विसरलात काय असा सवाल मनोज शेळके यांनी उपस्थित करत थेट मागील ग्रामपंचायत निवडणूकीचे फोटो, बातम्या आणि व्हिडीओ प्रसिद्ध केले आहेत.

हे फोटो सध्या प्रचारात कळीचा मुद्दा बनले आहेत.

मनोज शेळके यांनी पुढे बोलताना, मागील दहा वर्षात विकास कामे करताना भरपूर भ्रष्टाचार झाला, विकास कामांना खिळ बसली, दीड कोटी रुपये विकास निधी ग्रामपंचायतमध्ये तसाच पडून राहिला. निवडणुका आल्या की विकास करण्याच्या गप्पा मारायच्या आणि जनतेची नुसती फसवणूक करायची हा कार्यक्रम गेली दहा वर्षे सुरु आहे आणि याला जबाबदार सत्ताधारी आणि त्यांना साथ देणारे कापरे सुद्धा आहेत असा घणाघात मनोज शेळके यांनी केला आहे.

अवघ्या दोन वर्षांतच उखडला होता केडगाव गावातील मुख्य रस्ता, हाच का विकास असा टोला विरोधक लागवत आहेत.

मागील पाच वर्षांपूर्वी केडगाव ता. दौंड येथील निवडणूक प्रचारात आमदार राहुल कुल गटाचे सरपंच पदाचे उमेदवार अजित शेलार यांचा जाहीर सभेत प्रचार करतानाचा बाळासो कापरे यांचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होत आहे. या प्रचार सभेत बाळासो कापरे यांनी अजित शेलार यांना निवडून द्या, आम्ही केडगावचा विकास करू असे आश्वासन दिले होते मात्र आता तेच कापरे मागील दहा वर्षात केडगावचा विकास खुटला असे म्हणत आहेत हे दुटप्पीपणाचे नाही का असा सवाल ग्रामविकास परिवर्तन पॅनल चे मनोज संताजी शेळके यांनी उपस्थित करत सत्ताधारी कुल गटाच्या जनसेवा ग्रामविकास पॅनल आणि बाळासो कापरे यांच्या केडगाव विकास आघाडी पॅनलवर जोरदार टिका केली आहे.