दौंड : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी वर्गात समाविष्ट करून आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करीत मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. त्यांना साथ देण्यासाठी दौंड मध्येही सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
दि. 28 ऑक्टोबर पासून येथील राजाभाऊ कदम यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. या आंदोलनाला दौंड मध्ये मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आज दि. 31 ऑक्टोबर रोजी येथील ख्रिश्चन समाजाचे मा. नगरसेवक राजेश गायकवाड, राजेश जाधव, मुस्लिम समाजाचे मा.नगरसेवक शेख, मा. नगरसेवक जीवराज पवार तसेच प्रशांत धनवे, दीपक सोनवणे, अजय राऊत, सुहास वाघमारे, अमोल मुळे, जाकीर शेख, अफजल पानसरे यांनी साखळी उपोषणात सहभाग घेतला आहे.
त्याचप्रमाणे येथील आलमगीर मशिदीचे विश्वस्त अनिस इनामदार, हा.ईसामुद्दीन मण्यार, फिरोज तांबोळी यांनीही आंदोलकांची भेट घेत पाठिंबा दर्शविला. मराठा समाजाच्या तीव्र भावना सरकार दरबारी पोहोचविण्याकरिता आंदोलनास पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले.







