– सहकारनामा
दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव हे मोठे गाव असून येथे मोठी बाजारपेठ आहे.
मात्र राज्यात संचारबंदी लागू झाल्याने केडगाव आणि परिसरामध्येही संचारबंदी होईल आणि गरज नसताना नागरिक घराबाहेर पडणार नाही अशी आशा होती. मात्र केडगाव ची सध्याची परिस्थिती पाहता केडगावमध्ये नागरिकांचा फक्त संचार दिसून येत असून बंदीचा मात्र लवलेशही दिसून येत नाहीये.
केडगावमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तरीही अनेक ठिकाणी नागरिक बिनधास्तपणे संचार करताना दिसत आहेत. कुणालाही कोरोनाची भीती आहे असे गर्दी पाहून वाटत नाही. मात्र केडगाव आणि परिसरातील दवाखाने मात्र रुग्णांनी खचाखच भरल्याची परिस्थिती आहे.
प्रशासकीय यंत्रणेने केडगावमध्ये कडक धोरण अवलंबविण्याची गरज असून जर हि फिरती गर्दी नियंत्रणात आणली गेली नाही तर या ठिकाणी कोरोनाचा महा उद्रेक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.