Crime News
रावणगाव (दौंड) : दौंड तालुक्यातील रावणगाव येथे नव्याने ग्रामस्थ्यांच्या निवासस्थानासमोरून वाहने चोरीस जाण्याच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना सोमवारी दि.२३ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे.
रायचंद रांधवण (रांधवण वस्ती, रावणगाव, ता.दौंड) यांनी याबाबत फिर्याद दिली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची दुचाकी (एमएच ४२ एझेड २७१८) काल रात्री अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. तर रावणगाव येथूनच एक ट्रॅक्टर, ट्रॉली चोरीस गेली असल्याचे नागरिक सांगत समजत असून मेंढवाडगा परिसरातील दोन बंद घरांची कुलपे तोडण्यात आली तर एक दुचाकी चोरून नेण्याचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे फसला असल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळत आहे.
ट्रॅक्टर ट्रॉली आणि इतर घटनांची रात्री उशिरा पर्यंत संबंधितांनी तक्रार दाखल केली नव्हती. मात्र रायचंद रांधवण यांनी त्यांच्या दुचाकी चोरीची तक्रार मात्र दौंड पोलिस स्टेशन येथे दिली आहे. रावणगाव आणि परिसरात वारंवार घडणाऱ्या चोरींच्या घटनेमुळे शेतकरी आणि ग्रामस्थ त्रस्त झाले असून दौंड पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या रावणगाव पोलिस चौकीतील कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या रात्र गस्त संदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
याबाबत दौंड पोलिस स्टेशचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांची आज रावणगाव येथील ग्रामस्थांनी भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. यावेळी रावणगाव, रांधवण वस्ती येथील पद्माकर कांबळे, उद्योजक अमितराव रांधवण, प्रगतशील बागायतदार अनिकेत रांधवण आणि सागर गावडे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.