दौंड मधील ‘शिवजन सेवा युवा मंच’ च्या वतीने आमदार ‘राहुल कुल’ यांचा नागरी सत्कार

अख्तर काझी

दौंड : आमदार राहुल कुल यांनी दौंडसाठी स्वतंत्र प्रांत कार्यालय आणून दौंडकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोडविला तसेच दौंड शहर व तालुक्यातील विविध विकास कामे त्यांनी केली यासाठी येथील शिवजन सेवा युवा मंचच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

सत्कार समारंभासह नवरात्रोत्सवानिमित्त शिवजनच्या वतीने दांडिया महोत्सवाचे (स्पर्धा) आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत आ. राहुल कूल यांचा सत्कार करण्यात आला. दांडिया महोत्सवासाठी लकी ड्रॉ बक्षीस योजना आयोजित करण्यात आली होती, यामधील विजेत्यांना आमदार राहुल कुल, कांचन कुल, मा.नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. याच व्यासपीठावर राहुल कुल यांचा वाढदिवस (30 ऑक्टोबर) साजरा करण्यात आला.

याप्रसंगी भाजपाचे पदाधिकारी हरिश्चंद्र ठोंबरे ,स्वप्निल शहा तसेच पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील ,डॉ. समीर कुलकर्णी, पल्लवी कुलकर्णी, महेश भागवत, उद्योजक सुदाम नारंग, अनिल सोनवणे, अमोल काळे, सचिन कुलथे जॉन फिलीप आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार राहुल कुल यांनी शहर व तालुक्यातील अनेक प्रश्न, विकास कामे मार्गी लावली आहेत. शासनाच्या विविध योजना त्यांनी घराघरांमध्ये पोहोचविल्या आहेत. दौंडकरांसाठीचा अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे दौंडसाठी स्वतंत्र प्रांत कार्यालय त्यांनी आणले म्हणूनच त्यांचा दौंडकरांच्यावतीने नागरी सत्कार केला असे यावेळी शिवजन सेवा युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष रुपेश बंड म्हणाले.

सत्काराचे आभार मानताना आ. राहुल कुल म्हणाले की, दौंड शहर व तालुक्यातील विकास कामांसाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो व राहणार आहे. शासनाच्या विविध योजनांचा दौंडकरांना लाभ मिळावा यासाठी आम्ही काम करीत आहोत. प्रशांत पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. निखिल बंड, सुरज बंड, विकी थोरात, सागर मधुरकर, आकाश साळवे, किरण लोंढे, बबलू लाड, महेश राजे, विशाल मदने, कुणाल बंड आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.