खुशखबर.. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व लोकांचे लसीकरण केले जाणार !



| सहकारनामा |

नवीदिल्ली – 

देशातील कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेदरम्यान सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून, 18 वर्षांवरील सर्व लोक आता कोरोना लस घेण्यास सक्षम असतील.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत, कोरोनाची लस 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना दिली जात होती मात्र आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जास्तीत जास्त भारतीयांना कमीत कमी वेळात कोरोनाची लस मिळावी यासाठी सरकार एका वर्षापेक्षा अधिक काळ झाले कार्यरत आहे. 

16 जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरण सुरू झाले. आरोग्यसेविका आणि आरोग्य विभागाशी निगडित अग्रभागी कामगारांना अगोदर लस देण्यात आली होती. त्यानंतर, ही लस 60 वर्षांवरील आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली गेली. तर ज्यांना आधीच काही गंभीर आजाराने ग्रासले होते त्यांना यात अग्रभागी ठेवण्यात आले होते आणि 1 मार्च रोजी सरकारने 45 वर्षांवरील सर्व लोकांना कोरोना लस लागू करण्याची परवानगी दिली होती.

आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार असल्याने त्याबाबत नियोजित कार्यक्रम आखावा लागणार आहे जेणेकरून लोकांची गर्दी होणार नाही, आणि सर्वांचे लसीकरण होईल.