दौंड : पारगाव (ता. दौंड) येथे बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या दोन महिलांच्या हातातील रक्कम चोरी करून एक आरोपीने त्याच्या वाहणासह धूम ठोकली. अती वेगात जाणाऱ्या या आरोपीच्या गाडीची खुटबाव जवळ दुचाकीवरून घरी निघालेल्या सखाराम पिरतू हंडाळ (रा. हंडाळवाडी, केडगाव ता. दौंड) या तरुणाच्या गाडीला आरोपी चालवत असलेल्या वाहणाची जोरदार धडक बसली. या अपघातात ते दोघे जखमी झाले. यातील आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
तर यातील सखाराम हंडाळ या तरुणाला चेहऱ्यावर जखम झाल्याने केडगाव येथील थोरात हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचार करण्यात येऊन नंतर त्यास पुण्यातील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. अपघातात त्याच्या चेहऱ्यावर गंभीर जखम झाली होती मात्र आता त्याची प्रकृती व्यवस्थित असल्याने नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
या अपघात प्रकरणी उमेश सोपान गायकवाड (नेमणुक, यवत पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली असून स्कुटी मोटार सायकल एम.एच.12/टी.जी/5934 हिच्यावरील चालक आरोपी इब्राईम बाबु इराणी (वय 54, रा.शिवाजीनगर पुणे यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इब्राहिम इराणी याच्यावर या अगोदर शिरूर पोलीस स्टेशन येथे भा.द.वि.क.380, पिंपरी पोलीस स्टेशन येथे भा.द.वि.क.392, शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे भा.द.वि.क.323,324,504,34 तसेच खडक पोलीस स्टेशन येथे मुं.पो.अॅक्ट क.142 नुसार गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे.
गुन्हा दाखल दाखल अंमलदार म्हणून पोसई मटाले यांनी काम पाहिले असून तपासी अंमलदार पो.हवालदार दौंडकर हे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.