दौंड : केडगाव ता. दौंड येथील नागेश्वर विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी संपत मुरलीधर शेळके तर व्हाईस चेअरमनपदी विठ्ठल गणपत चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.
संपत शेळके यांनी नुकताच मा. आ.रमेश थोरात यांच्या गटामध्ये प्रवेश केला होता. नागेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने बिनविरोध निवडणूकीसह चेअरमन व व्हा.चेअरमन याच्या बिनविरोध निवडीची आपली ही परंपरा कायम राखली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी एस.एम गव्हाणे यांनी शेळके, चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला.
यावेळी नवीन अध्यक्षांचा सत्कार राजेंद्र शेळके यांनी तर उपाध्यक्ष यांचा सत्कार अरुण देशमुख यांनी केला. प्रमोद निंबाळकर यांनी निवडणूक प्रक्रिया अधिकारी एस.एम गव्हाणे, संस्थेचे सचिव विश्वासराव पवार आणि क्लार्क गणेश पांडुरंग शेळके यांचे आभार मानले. मार्केट कमिटीचे सदस्य सचिन लालासाहेब शेळके, धनंजय शेळके, विशाल शेळके, विकास परशुराम शेळके, दत्ता शेळके, गोरख शेळके, दत्ता भाऊसाहेब शेळके, विकास गणपत शेळके, अतुल पाटील शेळके, रोहिदास शेळके यांसह सोसायटीचे आजी-माजी संचालक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे आभार विलास परशूराम शेळके यांनी मानले.