बारामती : बारामती येथील प्रसिद्ध वकील अॅड. सुधीर पाटसकर यांचे वडिल शरद कृष्णाजी पाटसकर यांचे वयाच्या 87 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. नोकरी सोबतच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ख्याती होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा अॅड. सुधीर पाटसकर यांचे
ते वडील होते. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, विवाहित मुली तसेच नातवंडे असा मोठा
परिवार आहे.
कै. शरद कृष्णाजी पाटसकर हे लघु पाटबंधारे विभागातून निवृत्त झाले होते. अनेक सामाजिक आणि हिंदुत्ववादी संघटनांशी त्यांचा निकटचा संबंध होता. तसेच गोकूळवाडी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
त्यांचा जन्म 26.05.1936 रोजी झाला होता. त्यांचे निधन दि. 23.09.2023 रोजी बारामती येथे झाले. त्यांचा दशक्रिया विधी दि. 02.10.2023 रोजी होणार असल्याची माहिती त्यांचे नातू अॅड. भार्गव सुधीर पाटसकर यांनी ‘सहकारनामा’ ला दिली.