दिपगृह अॅकेडमी, देऊळगाव गाडा येथे उभे राहणार 300 बेडचे कोविड केअर सेंटर – आमदार राहुल दादा कुल यांची माहिती



| सहकारनामा |

दौंड : 

दौंड तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ऑक्सिजन बेड्स व विलगीकरणासाठी ‘आमदार राहुल कुल यांच्या फ़ंडातुन’ दिपगृह अॅकेडमी, देऊळगाव गाडा येथे अद्ययावत कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत आमदार राहुल कुल यांनी बोलताना या ठिकाणी १०० ऑक्सिजन बेड्स तसेच सुमारे २०० विलगीकरण बेड्स उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.  यावेळी दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांचे समवेत काल तेथे प्रत्यक्ष भेट देऊन सुरु असलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

प्रसंगी  श्री. नामदेव नाना बारवकर (उपाध्यक्ष भीमा पाटस), श्री. माऊली ताकवणे (अध्यक्ष भाजपा दौंड), श्री. तुकाराम ताकवणे (संचालक भीमा पाटस), श्री. विकास शेलार (संचालक, भीमा पाटस), आश्लेषा मॅडम (प्राचार्या दिपगृह अकॅडेमी) व डॉ. संदीप देशमुख आदी उपस्थित होते. 

सर्व तयारी पूर्ण होऊन लवकरच हे सुसज्ज कोव्हीड केअर सेंटर पण परिसरातील कोव्हीड रुग्णांसाठी खुले होऊन मोठी सोय होणार आहे.