| सहकारनामा |
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोना रुग्णांना दिलासा देण्याबाबत (Fight Against Corona) त्यांच्याकडून निर्देश देण्यात आले.
पुण्यात कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी कोरोना विषाणूची सद्यस्थिती, प्रशासनाच्या वतीनं करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसंच लसीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती जाणून घेतली.
तसेच आढावा बैठकीत त्यांनी माहिती घेऊन पुण्यात कोरोना बाधित रुग्ण वाढत असले तरी बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण देखील वाढत आहे, ही दिलासादायक बाब असल्याचे सांगत कोरोना रुग्णांना ऑक्सिजन व रेमडेसिवीरची कमतरता भासू नये यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन व ऑक्सिजनयुक्त बेडचा वापर आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार (Fight Against Corona) करणं आवश्यक असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी कोरोनाच्या रुग्णांसाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी आरोग्य व्यवस्था अधिकाधिक सक्षम करण्यावर भर द्या, कोरोना बाधित रुग्णांसाठी आरोग्यविषयक सेवा सुविधांमध्ये वाढ करा, वैद्यकीय क्षेत्रातील उपलब्ध मनुष्यबळाचे योग्य नियोजन करा, डॉक्टरांच्या कामांच्या वेळेचे नियोजन करा, शहर व ग्रामीण भागात ऑक्सिजन व व्हेंटिलेटरयुक्त बेड कमी पडणार नाहीत, याकडे लक्ष द्या, असे निर्देश दिले (Fight Against Corona).
गृह अलगीकरणातील रुग्णांकडून नियमांचे काटेकोर पालन होते का, याकडे लक्ष द्यावे, रेमडेसिवीरच्या बाबतीत कडक धोरण राबवावे तसंच कोरोना लसीकरणाला गती द्यावी अशी सूचना संबंधित यंत्रणेला त्यांनी दिल्या.
कोरोनाच्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखतीचे व्हिडीओ सामाजिक माध्यमातून प्रसारित करावेत जेणेकरून यामुळे सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्नांचे देखील निरसन होईल असे स्पष्ट निर्देश यावेळी त्यांनी दिले.