येथे फक्त माणुसकी चालते | वली मोहम्मद शेख यांची ‘आमदार राहुल कुल’ यांच्या माध्यमातून 5 लाखांची गुडघ्यांची शस्त्रक्रिया ‘मोफत’

आरोग्यविषयकअब्बास शेख

दौंड तालुक्यात जातीवाद, धर्मवाद या पेक्षा माणुसकीला महत्व दिले जाते. त्यामुळेच या तालुक्यातील विविध सण, उत्सव विविध जाती धर्माचे लोक आजही एकत्र येऊन साजरे करतात आणि येथे गरजू, लाभार्थी कोणत्या जाती, धर्माचा आहे हे न पाहता त्याची गरज ओळखून त्याला आमदार राहुल कुल यांच्यामार्फत मदत केली जाते असे अनेक घटनांमधून पुढे आले आहे. याचे ताजे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पिंपळगावचे वली मोहम्मद हनीफ शेख हे आहेत.

दौंड तालुक्यातील पिंपळगाव या गावचे रहिवासी असणारे वल्लीमोहम्मद हनीफ शेख यांना गुडघ्याचा मोठ्या त्रास सुरु झाला होता. त्यांना गुडघ्याच्या त्रासामुळे नीट बसता येत नव्हते की उठताही येत नव्हते. त्यांच्या गुडघ्यांची तपासणी केली त्यावेळी त्यांच्या गुडघ्यांची शस्त्रक्रिया करावी लागेल असे डॉक्टरांनी सुचवले आणि यासाठी साधारण पाच लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले.

जेमतेम आर्थिक परिस्थिती असणारे वल्ली मोहम्मद त्यामुळे हताश झाले होते मात्र त्यांच्या कुटुंबीय आणि सहकाऱ्यांनी ही बाब आमदार राहुल कुल यांना सांगितली आणि त्यांना सहकार्य करण्याची विनंती केली.

आमदार राहुल कुल यांनी लागलीच त्यांची माहिती घेत मुंबई येथील प्रसिद्ध रुग्णालयात संपर्क साधला आणि त्यांना रुग्णाची माहिती देऊन तेथे त्यांच्यावर मोफत उपचार करण्याचे सूचित केले. त्यामुळे वली मोहम्मद शेख यांची सुमारे 5 लाख रुपये खर्चाची गुडघ्याची शस्त्रक्रिया मुंबईतील त्या नामांकित रुग्णालयात संपूर्णपणे मोफत करण्यात आली.

एक पायही पुढे न टाकता येणारे वली मोहम्मद शेख हे स्वतःच्या पायावर आता चालत आहेत. त्यांनी आमदार राहुल कुल यांच्या निवासस्थानी जाऊन आपल्याला कुटुंबीयांसह त्यांची भेट घेतली आणि आभार व्यक्त केले. यावेळी आमदार राहुल कुल यांनी त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करून त्यांना उत्तम प्रकृत्ति व दीर्घायुसाठी शुभेच्छा दिल्या.