| सहकारनामा |
दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथे केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन टेस्ट (Rapid Antigen Test) कॅम्पला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
या कॅम्पमध्ये 72 लोकांची (Rapid Antigen Test) कोरोना टेस्ट करण्यात आली ज्यामध्ये 3 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर 69 जण निगेटिव्ह आले असल्याची माहिती केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी होनमाणे यांनी दिली.
हा कॅम्प सोमवार दिनांक 26/4/2021 रोजी सकाळी 10 वाजता केडगाव स्टेशन येथील जि.प.प्राथमिक शाळेत घेण्यात आला. या कॅम्पमध्ये आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.जी. होनमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक शिवाजी उर्फ नाना जगताप, लॅब टेक्निशियन चेतन कांचन, आरोग्य सेविका, पाटोळे सिस्टर, आरोग्य सेवक मकानदार यांनी काम पाहिले.
केडगावमधील सर्व व्यापारी, दुकानदार व नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये रॅपिड अँटीजेन (Rapid Antigen Test) कोरोना टेस्ट चा कॅम्प आयोजित करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली होती.
यावेळी केडगाव व परिसरातील व्यापारी, दुकानदार यांसह 72 जणांनी येथे कोरोना टेस्ट करवून घेतली. यामध्ये 3 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात 2 जण केडगावचे तर 1 जण भांडगाव येथील असल्याची माहिती देण्यात आली.