Arrest of online liquor seller on social media – सोशल मीडियावर ऑनलाइन दारू विकणारा जेरबंद, पुणे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई



| सहकारनामा |

पुणे : सोशल मीडियावर दारू ची ऑनलाइन जाहिरात टाकून (Arrest of online liquor seller on social media) विक्री करणाऱ्या इसमास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २५/०४/२०२१ रोजी फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईट वरील मार्केट प्लेस या ठिकाणी मॅकडॉवेल नंबर वन व्हिस्की १८० मिली ची ३०० रुपये या दराने विक्री चालू असल्याचे जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या बाबत राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक विभाग पुणे यांना तक्रार प्राप्त झाली होती.

सदर जाहिरात कोणी प्रसिद्ध केली व मद्याची विक्री होते की नाही याची खात्री करणेसाठी जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधला असता ऑनलाइन दारू विक्री करणाऱ्या (Arrest of online liquor seller on social media) इसमाने गाडीतळ हडपसर येथे मद्य देतो असे सांगून संबंधित अधिकाऱ्यांना वरील ठिकाणी येण्यास सांगितले होते.

या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त  कांतीलाल उमाप व मा. संचालक श्रीमती उषा वर्मा, मा.विभागीय उप आयुक्त श्री.प्रसाद सुर्वे, अधिक्षक श्री.संतोष झगडे यांचे मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा लावून आरोपी राजीव अग्रवाल (रा. भोसरी) यास मॅकडॉवल नंबर वन व्हिस्की १८० मिलीच्या २८ बाटल्या सह ताब्यात घेतले.

आरोपिकडून एकूण रू.४२००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन त्यावर मुंबई मद्य निषेध कायदा १९४९ चे कलम ६५ (इ),२४,७४ या प्रमाणे गुन्हा नोदविण्यात आला आहे. या कारवाई मध्ये दुय्यम निरीक्षक श्री.दीपक सुपे, महेश लैंडे, राहुल खाडगीर, निनाद निकम, कुणाल भांगरे, व जवान श्री तात्याबा शिंदे व सागर

धुर्वे यांनी सहभाग घेतला.