| सहकारनामा |
दौंड : दौंड तालुका आणि दौंड शहर मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या जाळ्यात आल्यानंतर आता दौंड ग्रामिण आणि शहरातून कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी होताना दिसत आहे. दौंड तालुक्यात रुग्णवाढीला ब्रेक लागल्यानंतर आता दौंड शहरातही कोरोना रुग्णांची संख्खा कमी होऊ लागली आहे.
दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दि. 26 रोजी एकूण 339 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यामध्ये 262 जनांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून 77 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
चाचणी करण्यात येत असलेल्या लोकांची संपूर्ण सरासरी पाहता 77% लोक निगेटिव्ह येत आहेत हि समाधानाची बाब मानली जात आहे. कारण मागील काही दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा जवळपास 50% टक्क्यांवर पोहोचला होता. तो आता घसरून 22% टक्क्यांवर आला आहे.
नागरिकांनी सोशल डिस्टनसिंग ठेवणे, मास्क चा वापर करणे, हात वारंवार साबणाने धुणे, सॅनिटायजर चा वापर करने या गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यास लवकरच कोरोना हद्दपार होऊ शकतो यात शंका नाही.