आरमान्या..! लका काही लाज, लज्जा शरम.. माणूस एक आणि गुन्हे 53, पण अखेर जाळ्यात आलाच

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

पुणे : तब्बल 53 गुन्ह्यांमध्ये सहभाग आणि मोक्का अंतर्गत कारवाई झालेली असूनही एक आरोपी पोलिसांपासून वाचण्यासाठी आणि आणखी गुन्हे करण्यासाठी सकाळी पुण्यात तर रात्री गुजरात आणि मुक्कामाला मध्यप्रदेश असा स्पोर्ट्स बाईकवर प्रवास करून पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र स्थानिक गुन्हे शाखेकडून अखेर या अट्टल गुन्हेगाराला सापळ्यात पकडून त्याला जेरबंद करण्यात यश आले आहे.

जानेवारी २०२३ पासून पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण जिल्हयातील घरफोडी, जबरी चोरी चे तब्बल ५३ गुन्हे घडले होते ज्यामध्ये आरोपी अरमान प्रल्हाद नानावत हा पोलिसांना पाहिजे होता. त्याला पकडण्याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिला होता. वॉन्टेड आरोपी अरमान प्रल्हाद नानावत याचा पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण चे पोलीस शोध घेत होते. तो वेळोवेळी पोलीसांना गुंगारा देत होता.

त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने अरमान नानावत याचे नातेवाईक, मित्र यांची माहिती हस्तगत करून आरोपीचे दिनक्रम माहिती करून घेतली. आरोपी अरमान नानावत हा स्पोर्ट बाईकचा वापर करतो, त्या मोटार सायकलचा वापर करून तो गुन्हे करतो आणि मोटार सायकलवरच गुजरात, मध्यप्रदेश असा प्रवास करत असल्याने सकाळी पुणे जिल्ह्यात तर रात्री गुजरात मध्ये तर कधी मध्यप्रदेश मध्ये मुक्काम असा काहीसा त्याचा प्रवास असायचा. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी पोलिसांनीही सलग १३ दिवस त्याच्यावर लक्ष केंद्रीत केले होते.

एक दिवस आरोपी अरमान नानावत हा कोरेगाव भिमा परीसरात येणार असल्याची बातमी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला समजली. पोलीस पथकाने त्वरित त्यास पकडण्यासाठी सापळा रचला आणि त्या सापळ्यात आरोपी अरमान प्रल्हाद नानावत (वय २४ वर्षे रा. वढु खुाता हवेली जि पुणे) हा अलगद अडकला. आरोपी अरमान नानावत याला विश्वासात घेवून त्याच्याकडे तपास केला असता, त्याने नोव्हेंबर २०२२ मध्ये शिरुर शहरात दोन महिलांचे गळयातील दागिने जबरीने ओढून मोटार सायकल वरून पळून गेला असल्याचे सांगितले. त्याबाबत पोलिसांनी खात्री केली असता शिरूर पोलीस स्टेशन गु.र.नं. ७८२ / २०२२ भा.दं.वि.का.क. ३९२ आणि शिरूर पोलीस स्टेशन गु.र.नं. ७३१ / २०२२ भा.दं.वि.का.क. ३९२ प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. तसेच आरोपी कडून सुमोर तीन तोळे वजनाचे 1 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत.

अरमान नानावत याच्यावर खालीलपैकी 53 गुन्हे दाखल असून त्याच्यावर मोक्का अंतर्गतही कारवाई करण्यात आलेली आहे.


सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल (पुणे ग्रामीण) अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे (पुणे विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोसई शिवाजी ननवरे, प्रदीप चौधरी, सफौ हनुमंत पासलकर, शब्बीर पठाण, पोहवा विजय कांचन, राजु मोमीण, अतुल डेरे, विक्रम तापकीर, राहुल घुबे, पोना समाधान नाईकनवरे, बाळासाहेब खडके, पोकॉ निलेश सुपेकर, चासफी प्रमोद नवले, चापोकॉ दगडू विरकर, यांनी केली असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोनि संजय जगताप व पोसई एकनाथ पाटील हे करीत आहेत.